Deepak Kulkarni
भाजप, महायुतीच्या लोकप्रिय उमेदवार पंकजा मुंडे यांची बुधवारी (ता.24) शहरात अभूतपूर्व अशी महारॅली निघाली.
फटाक्यांची आताषबाजी, ढोल ताशांचा निनाद, फुलांचा वर्षाव, जोश, जल्लोष आणि त्याच्या जोडीला मतदारांचा सळसळता उत्साह अशा जबरदस्त वातावरणात ही रॅली काढण्यात आली.
यावेळी पंकजा मुंडे यांचे कुटुंबियांकडून औक्षण करण्यात आले. यावेळी मातोश्री प्रज्ञाताई मुंडे यांचे दर्शन घेऊन आशीर्वाद घेतले.
परळीतील 'यश:श्री' या आपल्या निवासस्थानातून निघण्यापूर्वी पंकजा मुंडे यांनी पिता लोकनेते गोपीनाथराव मुंडे यांच्या प्रतिमेचे दर्शन घेऊन आशीर्वाद घेतले.
परळी वैजनाथ येथे पंचम ज्योतिर्लिंग वैद्यनाथाचे आशीर्वाद घेत त्या आपला उमेदवारी अर्ज दाखल करण्यासाठी रवाना झाल्या.
रॅलीपूर्वी दुपारी मुंडे यांनी महायुतीच्या प्रमुख नेत्यांसह जिल्हा निवडणूक निर्णय अधिका-यांकडे आपला उमेदवारी अर्ज दाखल केला.
शहरातील भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्याला पुष्पहार अर्पण करून अभिवादन करत पंकजाताई मुंडेंनी या रॅलीत उपस्थितांचे स्वागत सत्कार आणि आशीर्वाद घेतले.
जिल्ह्याचे पालकमंत्री धनंजय मुंडे,खासदार डॉ.प्रीतम मुंडे, मनसे नेते व मामा प्रकाश महाजन, महायुतीचे नेते यावेळी उपस्थित होते.