Ganesh Sonawane
ओला इलेक्ट्रिकचे संस्थापक आणि सीईओ भाविश अग्रवाल यांच्यावर एका कर्मचाऱ्याच्या आत्महत्येला प्रवृत्त केल्याचा आरोप आहे.
या प्रकरणात भाविश अग्रवाल यांच्यावर गुन्हा दाखल झाल्याने ते चर्चेत आले आहेत.
भाविश अग्रवाल यांचा जन्म लुधियाना, पंजाब येथे झाला.
त्यांनी आयआयटी मुंबई येथून कॉम्प्युटर सायन्समध्ये पदवी प्राप्त केली आहे
त्यांनी २०१० मध्ये अंकित भाटी यांच्यासोबत मिळून ओला कॅब्सची स्थापना केली. भारतातील २५० हून अधिक शहरांमध्ये ओलाचा विस्तार झाला.
फोर्ब्सनुसार, १४ जुलै २०२५ पर्यंत भाविश अग्रवाल यांची एकूण संपत्ती १.९ अब्ज डॉलर्स (सुमारे १६,००० कोटी रुपये) इतकी असल्याचा अंदाज आहे.
ओला इलेक्ट्रिकच्या शेअर्सच्या कामगिरीने त्यांच्या एकूण संपत्तीत महत्त्वाची भूमिका बजावली आहे.
त्यांच्या धाडसी विचारसरणी आणि तंत्रज्ञानाभिमुख दृष्टिकोनामुळे त्यांना २०१८ मध्ये टाइम मॅगझिनच्या जगातील १०० सर्वाधिक प्रभावशाली व्यक्तींच्या यादीत स्थान मिळाले.