Jagdish Patil
भाजपचे नेते आणि माजी अर्थ आणि सिंचनमंत्री प्राध्यापक महादेवराव शिवणकर यांचे 85 व्या वर्षी (ता.20) वृद्धापकाळाने निधन झाले.
राज्यात सर्वत्र काँग्रेसचे प्राबल्य असताना त्यांनी गोंदिया आणि भंडारा जिल्ह्यात भाजपला मोठा लोकाश्रय मिळवून दिला होता.
शिवणकर यांनी आमगाव विधानसभेचे 5 वेळा आमदार आणि चिमूर लोकसभेचे 1 वेळा खासदार म्हणून कार्यकाळ सांभाळला आहे.
विदर्भातील सिंचनाचा अनुशेष भरून काढण्यासाठी त्यांच्याच कार्यकाळात विदर्भासह राज्यभरात विभागनिहाय सिंचन मंडळाची स्थापना करण्यात आली होती.
संघाचे स्वयंसेवक म्हणून त्यांनी सामाजिक क्षेत्रात प्रवेश केला होता. ते सुरुवातीला प्राध्यापक होते त्यानंतर भाजपने त्यांना उमेदवारी दिला.
1978, 80 आणि 86 असे सलग तीन वेळा ते आमगाव विधानसभा मतदारसंघातून विजयी झाले. 1990 च्या निवडणुकीत पराभूत झाल्यानंतर त्यांनी पुन्हा 1995 मध्ये विधानसभेत पुनरागमन केलं.
मुख्यमंत्री मनोहर जोशी यांच्या मंत्रिमंडळात ते राज्याचे अर्थमंत्री होते. यावेळीच त्यांनी सिंचन महामंडळांची स्थापना केली.
1999 मध्ये ते पुन्हा निवडून आले. मात्र राज्यात काँग्रेसची सत्ता आले आणि त्यांची हीच शेवटची टर्म ठरली.
2004 मध्ये चिमूर लोकसभा मतदारसंघातून निवडून गेल्यानंतर राष्ट्रसंत तुकडोजी महाराजांना भारतरत्न देण्याची मागणी संसदेत केली होती.