Ganesh Sonawane
छत्रपती शिवाजी महाराजांच्या 12 किल्ल्यांचा युनेस्कोच्या जागतिक वारसा यादीत समावेश करण्यात आला आहे.
यात साल्हेर किल्ल्याचा समावेश असून हा किल्ला नाशिक जिल्ह्यातील सटाणा तालुक्यात आहे.
साल्हेर-मुल्हेर या जोडीतला हा साल्हेरचा किल्ला असून सह्याद्री पर्वतरांगेतील महाराष्ट्रातील सर्वात उंच किल्ला आहे.
साल्हेर किल्ल्याची उंची 1567 मीटर (5,141 फूट) आहे.
हा किल्ला मराठा साम्राज्याचा एक महत्त्वाचा भाग होता. साल्हेर किल्ल्यावर मराठ्यांनी सुरतेवर छापा टाकून मिळवलेले पैसे आणून ठेवले होते.
साल्हेर किल्ल्यामध्ये अनेक ऐतिहासिक अवशेष आहेत, जसे की बुरुज, तटबंदी, पाण्याची टाकी आणि गुहा.
साल्हेर हा महाराष्ट्रातील एक प्रसिद्ध डोंगरी किल्ला आहे. या किल्ल्याला कळसूबाईच्या (१,६४६ मी.) खालोखाल उंची असलेले दुसऱ्या क्रमांकाचे शिखर आहे.
भगवान परशुराम यांनी अनेक वर्षे या ठिकाणी तपश्चर्या केली. अशी आख्यायिका आहे.