Jagdish Patil
देवेंद्र फडणवीसांनी CM पदाचा पदभार स्वीकारल्यानंतर विधानसभेचे 3 दिवसांचे विशेष अधिवेशन होणार आहे.
या हंगामी अधिवेशनाच्या अध्यक्षपदी भाजप आमदार कालिदास कोळंबकर यांची नियुक्ती करण्यात आली आहे.
राजभवन येथे राज्यपाल सी.पी. राधाकृष्णन यांनी त्यांना हंगामी विधानसभा अध्यक्षपदाची शपथ दिली.
हंगामी अध्यक्षपदी नियुक्ती झालेले आमदार कालिदास कोळंबकर यांचा राजकीय प्रवास कसा आहे ते जाणून घेऊया.
यंदाच्या विधानसभा निवडणुकीत कालिदास कोळंबकर वडाळा मतदारसंघातून विजयी झाले आहेत.
या निवडणुकीत विजयी होत त्यांनी सलग 9 वेळा आमदार होण्याचा विक्रम केला आहे.
1990 ते 2004 सालापर्यंत त्यांनी शिवसेनेतून विधानसभा निवडणूक लढवली होती.
2005 मध्ये माजी मुख्यमंत्री नारायण राणे यांच्यासह त्यांनीही शिवसेनेला सोडचिठ्ठी देत काँग्रेसमध्ये प्रवेश केला.
तर 2014 च्या मोदी लाटेत त्यांनी भारतीय जनता पक्षात प्रवेश केला. तेव्हापासून ते भाजपसोबत आहेत.