सरकारनामा ब्यूरो
भारतीय घटनेचे शिल्पकार भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांची आज 68 वी पुण्यतिथी आहे. या दिवसाला महापरिनिर्वाण दिन म्हणतात. यानिमित्ताने त्यांना अभिवादन करण्यात आले.
नरेंद्र मोदींनी संसद भवनात डॉ. बाबासाहेब आंबेडकरांना अभिवादन केले.
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी मुंबईत उपस्थित राहून विनम्र अभिवादन केले.
उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी दादर चैत्यभूमी येथे डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांना अभिवादन केले.
उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी चैत्यभूमी येथे जाऊन बाबासाहेबांच्या पुतळ्यास अभिवादन केले.
राज्यपाल सी.पी.राधाकृष्णन यांनी देखील उपस्थिती लावत डॉ.बाबासाहेब आंबेडकरांना महापरिनिर्वाण दिनानिमित्त विनम्र अभिवादन केले.
मुंबई महापालिकेने आयोजित केलेल्या फोटोंच्या प्रदर्शनास भेट देऊन मान्यवरांनी आंबेडकरांच्या आठवणींना उजाळा दिला.
माजी खासदार नरेंद्र जाधव यांच्या 'भारतीय प्रजासत्ताक साकारणारा महामानव' या पुस्तकाचे प्रकाशन करण्यात आले.