Pradeep Pendhare
बिहार विधानसभा निवडणुकीच्या प्रचाराला वेग आला असून भाजपचे पीएम पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि काँग्रेसचे राहुल गांधी यांच्या सभाचं नियोजन सुरू आहे.
बिहार विधानसभेच्या 243 जागांसाठी निवडणूक होत असून, प्रचार चांगलाच तापला आहे.
बिहारमध्ये 'एनडीए'विरुद्ध इंडिया आघाडी, असा सामना दिसत असून, मोदीविरुद्ध गांधी अशी लढत दिसेल.
बिहार विधानसभेसाठी 'एनडीए'चे सर्व जागा वाटप शांततेनं झालं असून, इंडिया आघाडीतील काँग्रेस, राजद आणि इतर पक्षांमध्ये काही जागांवर मतभेद आहेत.
पंतप्रधान नरेंद्र मोदी बिहारमध्ये 23 ऑक्टोबर ते 3 नोव्हेंबर दरम्यान 12 मोठ्या सभा घेणार आहेत.
सासाराम, गया, भागलपूर, दरभंगा, मुजफ्फरपूर, पाटणा, छपरा, पूर्व चंपारण, समस्तीपूर, पश्चिम चंपारण, सहर्सा अन् अररिया इथं मोदींच्या सभाचं नियोजन आहे.
राहुल गांधी यांचा पाटणा इथं 24 ऑगस्टला कार्यक्रम झाला होता. अमेरिका दौरा करून आल्यानंतरही ते बिहारमध्ये दिसले नाहीत.
इंडिया आघाडीचे 'स्टार फेस' राहुल गांधी मात्र निवडणुकीच्या प्रचारापासून अजून दूर आहेत.