Jagdish Patil
लोकप्रिय गायिका मैथिली ठाकूरला भाजपने बिहार विधानसभेसाठी उमेदवारी दिली असून ती अलीनगर मतदारसंघातून निवडणूक लढवणार आहे.
अवघ्या 25 वर्षाच्या मैथिलीला भाजपने निवडणुकीच्या रिंगणात उतरवल्यामुळे आता तिच्याबाबतची माहिती जाणून घेण्यासाठी लोक उत्सुक आहेत.
याच पार्श्वभूमीवर मैथिलीचं नेटवर्थ किती आणि तिचं शिक्षण किती झालं आहे याबाबतची माहिती जाणून घेऊया.
तिचा जन्म 25 जुलै 2000 रोजी बेनिपट्टी, मधुबनी, बिहार येथे झाला. तिला एक भाऊ आणि बहीण आहे. ज्यांची नावे ऋषभ, अयाची अशी आहेत.
या तिन्ही भावंडांनी शालेश शिक्षणासोबत हिंदुस्थानी शास्त्रीय संगीत, हार्मोनियम आणि तबल्याचंही शिक्षण घेतलं.
मैथिलीला संगीताचा वारसा वडील रमेश यांच्याकडून मिळाला आहे. ते संगीत शिक्षक होते. त्यामुळे तिने लहानपणापासून संगीत शिक्षण घ्यायला सुरूवात केली.
मैथिलीनं दिल्ली विद्यापीठाच्या आत्माराम सनातन धर्म महाविद्यालयातून पदवी मिळवली आहे.
एका रिपोर्टनुसार, तिची एकूण संपत्ती सुमारे 7 ते 10 कोटी आहे. सोशल मीडियावर तिचे लाखो फॉलोअर्स आहेत. ती एका पोस्टसाठी अंदाजे 50 लाख रुपये घेते.
ती एका शोसाठी अंदाजे 5 ते 7 लाख मानधन घेते. महिन्याला ती 12 ते 15 शो करते. त्यामुळे ती महिन्याला 90 लाख ते 1 कोटी रुपये कमावते.