सरकारनामा ब्यूरो
स्वामी विवेकानंद यांच्या जयंतीनिमिती नवी दिल्लीतील भारत मंडपम येथे आयोजित केलेल्या ‘विकसित भारताच्या युवा नेतृत्वांशी संवाद' कार्यक्रमासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी सहभागी झाले होते.
या कार्यक्रमासाठी 30 लाख तरुणांपैकी 3 हजार तरुणांची निवड करण्यात आली होती. यात महिंद्रा, अमिताभ कांत आणि इस्रोचे अध्यक्ष एस सोमनाथ यांसारख्या दिग्गजांनी मार्गदर्शन केले.
यावेळी कार्यक्रमात एक मुलगी स्वामी विवेकानंदांचा वेश परिधान करून आली होती. त्यामुळे मोदींनी तिचं भरभरुन कौतुक केलं.
'आज अनेक क्षेत्रांमध्ये भारतातील युवा नेतृत्व विविध क्षेत्रात महत्त्वाची भूमिका पार पाडतात', अस पंतप्रधान म्हणाले.
प्रदर्शनात युवकांनी तयार केलेल्या प्रकल्पाशी संबंधित माहिती यावेळी मोदींनी घेतली.
पंतप्रधान मोदींनी 'X' वर या कार्यक्रमाची पोस्ट टाकली आहे.
कोरोना काळात केलेल्या कामगिरीबद्दल त्यांनी तरुणांचं आणि भारतीय शास्त्रज्ञांच्या कामगिरीचं आभार मानले.
युवा शक्तीमध्ये भारताला लवकरात लवकर विकसित राष्ट्र बनवण्याची क्षमता असल्याचा आणि देशातील तरुण पिढी ही देशाला विकसित करण्यासाठी मदत करेल. असा विश्वास पंतप्रधानांनी यावेळी व्यक्त केला.
तरुणांवरील विश्वासामुळे विकसित भारत युवा नेतृत्व संवादाचा पाया तयार झाला. मला विश्वास आहे की, तरुणांची शक्ती भारताला लवकरात लवकर विकसित राष्ट्र बनवेल. असंही यावेळी मोदी म्हणाले.