सरकारनामा ब्यूरो
भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांचा सोमवारी (ता. 13 जानेवारी) वाढदिवस. त्यांनिमित्त मागील 10 वर्षांत त्यांच्या राजकीय वाटचालीतील चढउताराचा घेतलेला हा आढावा.
भाजपचे एकनिष्ठ नेते म्हणून ओळख. 2004 पासून ते कामठी विधानसभा मतदारसंघाचे प्रतिनिधित्व करत आहेत. 2014 मध्ये भाजपची सत्ता आल्यानंतर ऊर्जामंत्रिपदी वर्णी.
2019 च्या निवडणुकीत बानवकुळे यांचं तिकीट कापण्यात आले. पण त्यानंतरही ते जोमाने पक्षासाठी काम करत राहिले. पक्षाने त्यांना विधान परिषदेत संधी दिली.
बावनकुळे हे 12 ऑगस्ट 2022 रोजी भाजपचे प्रदेशाध्यक्ष बनले. त्यानंतर राज्यभर पहपक्षवाढीसाठी त्यांनी मोठे कष्ट उपसले.
प्रदेशाध्यपद मिळाल्यानंतर त्यांच्या नेतृत्वाखाली पक्षाला लोकसभेच्या निवडणुकीला सामोरे जावे लागले. पण भाजपला अपेक्षित यश मिळाले नाही.
भाजपला महाराष्ट्रात कमी जागा मिळाल्याने भाजपला स्वबळावर बहुमताच्या जवळपासही पोहचता आले नाही. त्यामुळे पक्षात निराशेचे वातावरण होते.
विधानसभा निवडणुकीत भाजपने बावनकुळे यांच्यावर विश्वास दाखवत त्यांना कामठीतून उमेदवारी दिली आणि ते विजयी झाले. पक्षालाही घवघवीत यश मिळाले.
भाजप आणि महायुतीसाठी हा विजय ऐतिहासिक ठऱला. युतीला 288 पैकी 237 जागा, तर एकट्या भाजपने 133 जागा जिंकल्या. यामध्ये अर्थातच बावनकुळे यांचाही मोठा वाटा आहे.
महायुतीची सत्ता आल्यानंतर अनेक बड्या नेत्यांची मंत्रिपदी वर्णी लागली नाही. मात्र, बावनकुळे यांना थेट महसूल मंत्रिपदाचे बक्षिस मिळाले.
राज्यात भाजपचे सदस्य वाढवण्यासाठी बावनकुळे पुन्हा कामाला लागले आहेत. दीड कोटी सदस्यनोंदणी लक्ष्य समोर ठेवण्यात आले आहे. त्यांचा कार्यकाळ लवकरच संपणार आहे.