सरकारनामा ब्यूरो
भारताची लोकसंख्या अंदाजे 1.46 अब्ज इतकी आहे. तर जाणून घेऊयात, असं कोणतं राज्य आहे, जे अतिशय गरीब आहे.
पंतप्रधान आर्थिक सल्लागार परिषद (EAC-PM) 2024 च्या रिपोर्टनुसार, या राज्याचे नाव समोर आले आहे.
EAC-PM रिपोर्टनुसार श्रीमंताच्या यादीत तेलंगणा, दिल्ली, हरियाणा, महाराष्ट्र आणि उत्तराखंड या राज्याचा समावेश आहे.
EAC-PM 2024 च्या रिपोर्टनुसार, भारतातील बिहार हे अतिशय गरीब लोकसंख्येच्या राज्य म्हणून पहिल्या क्रमांकवर येते, तर जाणून घेऊयात यामध्ये आणखी 5 राज्य कोणती आहेत?
गरीब लोकसंख्येचे राज्यात बिहारनंतर दुसऱ्या क्रमांकावर उत्तर प्रदेशचे नाव येते. त्यानंतर तिसऱ्या क्रमांकावर मध्य प्रदेश, चौथ्या क्रमांकावर राज्यस्थान आणि पाचव्या क्रमांकावर छत्तीसगडचा समावेश आहे.
दरडोई उत्पन्नाच्या आधारावरुन भारतातील गरीब आणि श्रीमंत लोकांची संख्या किती आहे हे ठरवले जाते.
लोकसंख्येच्या गणनेसाठी देशाच्या एकूण उत्पन्नाला राज्याच्या एकूण लोकसंख्येने भागून त्यांची आकडेवारी काढली जाते.
गरीब आणि श्रीमंत लोकांची संपत्ती ठरवण्यासाठी प्रत्येक राज्याचे दरडोई उत्पन्न आधार म्हणून रिपोर्ट बनवण्यासाठी घेतले जाते.