Mayur Ratnaparkhe
कॉमेडियन कुणाल कामराने एकनाथ शिंदेबाबत टिप्पणी केल्यानंतर राहुल कनाल यांनी शिवसैनिकांसह जाऊन तो स्टुडिओ फोडला होता.
राहुल कनाल हे पूर्वी ठाकरे गटाचे नेते आदित्य ठाकरे यांचे जवळचे सहकारी होते.
२०१० मध्ये राहुल कनाल आदित्य ठाकरे यांच्या नेतृत्वाखालील अविभाजित शिवसेनेच्या युवासेनेचे नेते होते.
राहुल कनाल मुंबईच्या पॉश परिसरात म्हणजेच वांद्रे परिसरात प्रसिद्ध व्यक्तिमत्व आहे.
राहुल कनाल यांनी शिवसेनेच्या युवा शाखेतून आपल्या राजकीय कारकिर्दीची सुरुवात केली होती.
राहुल कनाल मुंबईतील वांद्रे येथे एक रेस्टॉरंट देखील चालवतात.
याशिवाय राहुल कनाल यांचे चित्रपट आणि मनोरंजन जगतातील सेलिब्रिटींशी संबंध आहेत.
राहुल कनाल यांनी जुलै २०२३ मध्ये आदित्य ठाकरेंच्या कामकाजावर नाराजी व्यक्त करून एकनाथ शिंदेंच्या शिवसेनेत प्रवेश केला होता.
एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेत गेले, तेव्हापासून ते शिंदे यांच्या युवा सेनेच्या कोअर कमिटीचे सदस्य आणि सरचिटणीस आहेत.