सरकारनामा ब्यूरो
पहिल्याच प्रयत्नात UPSC सारखी कठीण परीक्षा उत्तीर्ण करत IAS बनलेल्या सृष्टी डबास यांची सक्सेस स्टारी वाचा...
दिल्लीच्या रहिवासी असलेल्या सृष्टी डबास यांनी यूपीएससी सिव्हिल सर्व्हिसेसमध्ये 6 वा क्रमांक पटकावला.
सृष्टी यांनी त्यांचे प्राथमिक शिक्षण गंगा इंटरनॅशनल स्कूल येथून पूर्ण केले यानंतर, CBSE 12वीच्या बोर्ड परीक्षा 2016-17 मध्ये 96.33% टक्के मिळवले.
दिल्ली विद्यापीठातून इंद्रप्रस्थ कॉलेजमधून राज्यशास्त्रात बी.ए केले आणि 'IGNOU' येथून 'एमए' मध्ये पदवी त्यांनी प्राप्त केली.
पदवीनंतर त्यांनी UPSC परीक्षा परीक्षेची तयारी सुरु केली. तयारीदरम्यान त्या मुंबईतील रिझर्व्ह बँक ऑफ इंडिया (RBI) मध्ये ग्रेड 2 HR कर्मचारी म्हणून पूर्णवेळ काम करत होत्या.
त्या दिवसा काम करायच्या आणि रात्री UPSC परीक्षेचा अभ्यास. RBIमध्ये रुजू होण्यापूर्वी त्या सामाजिक न्याय आणि अधिकारिता मंत्रालयात नोकरी करत होत्या.
आरबीआयच्या लायब्ररीत अभ्यास करत सृष्टी डबास यांनी 2023 च्या UPSC सिव्हिल सर्व्हिसेस (मुख्य) परीक्षेत 6वा क्रमांक मिळवून IAS अधिकारी होण्याचे ध्येय गाठले.
कोणत्याही कोचिंगशिवाय त्यांना 1048 इतके गुण मिळाले आहेत. त्यामुळे सृष्टीचे हे यश खूप खास आहे.