सरकारनामा ब्यूरो
रेल्वे तिकीट बुकिंगचे नियमही बदलणार आहेत. वेटिंग तिकिटावर प्रवास फक्त सामान्य डब्यांमध्येच करता येईल. आरक्षणाचा कालावधी 60 दिवसांपर्यंत कमी केला आहे.
1 मे 2025 पासून एफडी आणि बचत खात्याच्या व्याजदरांबाबत सुधारणा करण्याची शक्यता आहे.
1 मे रोजी गॅसच्या किमतीत वाढ किंवा घट होईल. त्याचा परिणाम तुमच्या महिन्याच्या बजेटवर होण्याची शक्यता आहे.
पेन्शन व्यवहारासाठी एसएमएस/ई-मेल अलर्ट सुरू केले जातील. बँकांमध्ये पेन्शन हेल्पडेस्क स्थापन केला जाईल. डिजिटल पेन्शन पासबुक प्रणाली सुरू केली जाईल.
मोफत व्यवहाराची मर्यादा ओलांडली गेली तर तुम्हाला एटीएममधून पैसे काढण्यासाठी जमा करण्यास किंवा बॅलन्स तपासण्यासाठी अतिरिक्त शुल्क आकारले जातील. पैसे काढण्याचे शुल्क आता प्रति व्यवहार रु. 17 वरून र. 19 पर्यंत वाढवले आहे.
देशातील 11 राज्यांमध्ये “एक राज्य, एक आरआरबी” धोरण लागू होणार आहे.बँकांची कार्यक्षमता वाढवणे आणि खर्च कमी करण्याचे या उपक्रमाचे उद्दिष्ट आहे.
रेशनकार्डधारकांना ई-केवायसी करणे बंधनकारक आहे, ज्यांचे नाव रेशनकार्डमध्ये असेल तर त्याला ई-केवायसी करणे अनिवार्य असेल.