सरकारनामा ब्यूरो
शिरुर लोकसभा मतदारसंघाचे माजी खासदार, दररोज २० मिनिटे सूर्यनमस्कार व पुशअप व्यायाम करतात.
पहाटे पावणेसहा वाजता उठून शाळेच्या ग्राऊंडवर सव्वातास चालतात,ही दिनचर्या गेल्या नऊ वर्षांपासून सुरू आहे.
शिवाजीराव आढळराव पाटील हे गहू-तांदूळ पूर्ण वर्ज्य करुन आहारात मोजकेपणा आहे.
३० वर्षे मधुमेहामुळे ७८ युनिट्स इन्शुलिन घेत असलेले आढळराव ६८ व्या वर्षी जेमतेम ८ युनिटपर्यंत आले आहे.
मधुमेहमुक्तीच्या दिशेने त्यांचे यशस्वी पाऊल पडल्याचे ते आवर्जून सांगतात. मधुमेहालाही संपूर्ण संपविण्याच्या दिशेने ते चाललेत आहेत.
२००४ पासून सुरू केलेला जनता दरबार आजही सुरू आहे. जनता दरबार दर रविवारी सकाळी १० वाजता सुरू होतो.
जनतेच्या सुख-दु:खात सोबत राहण्याची सवयही आपल्या तंदुरूस्तीचे खरे गुपित असल्याचे ते आवर्जून सांगतात.
लोकसभा निवडणुकीत हॅट्ट्रिक करणारे पूर्वाश्रमीचे शिवसैनिक व आता ते राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये आहेत.