Rashmi Mane
बुधवार, 1 ऑक्टोबरपासून देशभरात अनेक महत्त्वाचे आर्थिक आणि दैनंदिन जीवनाशी संबंधित बदल होणार आहेत. या बदलांचा थेट परिणाम बँकिंग, गुंतवणूक, रेल्वे तिकीट, गॅस सिलेंडर, टपाल सेवा अशा विविध क्षेत्रांवर होणार आहे.
राष्ट्रीय पेन्शन योजनेत (NPS) खासगी क्षेत्रातील गुंतवणूकदारांना आता 100% पर्यंत रक्कम इक्विटीमध्ये गुंतविण्याची मुभा मिळणार आहे. यामुळे जास्त परतावा मिळू शकतो, पण जोखीमही वाढेल.
शेअर बाजारातील जोखीम कमी करण्यासाठी सेबीने इंडेक्स ऑप्शनवरील मोठ्या ट्रेडिंग पोझिशन्सवर नवीन फ्रेमवर्क लागू केले आहे.
1 ऑक्टोबरपासून परदेशी नागरिकांना भारतात येणे सोपे होईल. इमिग्रेशन काउंटरवर रांग न लावता ते डिजिटल अरायव्हल कार्ड ऑनलाइन भरू शकतील.
भारतीय रेल्वेने मोठा निर्णय घेतला आहे. आता आरक्षण सुरू झाल्यानंतर पहिल्या 15 मिनिटांत फक्त आधार लिंक असलेल्या IRCTC खात्यातूनच तिकीट बुकिंग करता येईल.
सरकार लघु बचत योजनांचे व्याजदर तिमाही बदलते. ऑक्टोबर ते डिसेंबर 2025 या तिमाहीसाठी नवीन दर जाहीर होणार आहेत. यावेळी व्याजदर कमी होण्याची शक्यता आहे.
प्रत्येक महिन्याच्या 1 तारखेला एलपीजी सिलेंडरच्या किंमतीत बदल होतो. 14.2 किलोच्या घरगुती सिलेंडरची सध्याची किंमत दिल्लीमध्ये 853 रुपये आहे.
आरबीआयची एमपीसी बैठक सोमवारपासून सुरू झाली असून निर्णय बुधवारी जाहीर होतील. या वर्षी रेपो दरात तीनदा एक टक्का कपात झाली आहे. यावेळी दर बदलल्यास कर्जाच्या हप्त्यांवर थेट परिणाम होईल, तर मुदत ठेवींवरील व्याजदरात घट होण्याची शक्यता आहे.
1 ऑक्टोबरपासून UPI अॅप्सवरील P2P "कलेक्ट रिक्वेस्ट" सुविधा बंद होणार आहे. आता QR कोड स्कॅन करून किंवा कॉन्टॅक्ट नंबर टाकूनच पेमेंट करता येईल.
डाक विभागाने स्पीड पोस्टचे दर वाढवले असून, ओटीपी डिलिव्हरी आणि रिअल-टाइम ट्रॅकिंगसारख्या नवीन सुविधा सुरू केल्या आहेत.
सरकारने ऑनलाइन गेमिंगसाठी नवीन कायदा लागू केला आहे. कंपन्यांना परवाना घेणे बंधनकारक राहील आणि खेळाडूंची किमान वयाची अट 18 वर्षे असेल.