सरकारनामा ब्यूरो
शालेय जीवनात नापास विद्यार्थी असा शिक्का असलेल्या या अधिकाऱ्याने कधीही हार नाही मानली.
आयुष्यात पुढे जाण्यासाठी, हवं असलेलं प्रेम मिळवण्यासाठी त्यांनी हरतऱ्हेचे प्रयत्न केले आणि अखेर IPS अधिकारी होण्याचं आपलं स्वप्नही पूर्ण केलं.
बालपणापाासूनच IPS मनोज कुमार शर्मा यांनी जीवनातील आपल्या प्रत्येक गरजांसाठी प्रचंड संघर्ष केला आहे.
मध्य प्रदेशातील मोरेना जिल्ह्यातील छोट्याशा गावात जन्म, घरची आर्थिक परिस्थिती बिकट आणि अभ्यासातही रस नसल्याने कसेबसे त्यांनी शिक्षण पूर्ण केले.
महाविद्यालयीन शिक्षणानंतर लोकसेवा आयोगाची परीक्षा द्यायचे ठरवले आणि अभ्यासासाठी ते दिल्लीला आले.
अशा स्थितीत दिल्लीत संघर्ष करणे यांच्यासाठी त्यांच्यासाठी अजिबात सोपे नव्हते.
शैक्षणिक फी भरण्यासाठी आणि उदरर्निवाहासाठी त्यांनी टेम्पो चालवला, फूटपाथवर झोपले, लायब्ररीत काम केले आणि श्रीमंतांच्या श्वानांनाही फिरवले.
तयारीदरम्यान मनोज कुमार शर्मा हे उत्तराखंडच्या श्रद्धा जोशींच्या प्रेमात पडले. पण त्यांच्या कुटुंबाचा यासाठी नकार होता.
हे कळल्यानंतर कठीण काळातही श्रद्धाने मनोज यांना पाठींबा दिला. दोघेही UPSC परीक्षा उत्तीर्ण झाले आहेत.