Rashmi Mane
महाराष्ट्र परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांनी मोठी घोषणा केली आहे. आता लांब पल्ल्याच्या एसटी प्रवासावर पुरुष प्रवाशांनाही 15% सूट मिळणार!
आतापर्यंत फक्त महिलांना 50% सवलत होती, आता पुरुष प्रवाशांनाही आरक्षणावर 15% सूट मिळणार आहे.
ही योजना येत्या जुलै 2025 पासून कार्यान्वित होणार असून, कमी गर्दीच्या हंगामासाठी खास सवलत देण्यात येणार आहे.
ई-शिवनेरीसारख्या लांब पल्ल्याच्या बस प्रवास करणाऱ्या प्रवाशांना याचा थेट फायदा होणार!
प्रवासाच्या आधीच तिकीट काढणाऱ्या प्रवाशांना तिकीट दरात 15% सूट मिळेल. ही योजना प्रवाशांची संख्या वाढविण्यासाठी राबवली जात आहे.
एसटी कर्मचाऱ्यांसाठी बदल्यांची प्रक्रिया आता पूर्णपणे ऑनलाइन होणार, पारदर्शकता राखण्यासाठी मोठा निर्णय.
यशवंत नाट्य मंदिर येथे 77 व्या वर्धापन दिनानिमित्त विविध योजना, पुरस्कार व पुस्तक प्रकाशनाचा कार्यक्रम पार पडला.
एसटीच्या 77 वर्षांच्या प्रवासावर आधारित “वाहननामा” हे चित्रमय पुस्तक मान्यवरांच्या हस्ते प्रकाशित!