Rashmi Mane
आजचा दिवस खुप खास आहे. आजच्याच दिवशी 1971ला भारताने युद्धात पाकिस्तानचा फक्त पराभवच केला नाही. तर, तत्कालीन पूर्व पाकिस्तान म्हणजेच बांगलादेश पाकिस्तानपासून वेगळा झाला आणि नवीन देशाला मान्यता मिळाली.
आज संपूर्ण देश विजय दिवस साजरा करत आहे. या दिवशी तब्बल 13 दिवस चाललेल्या युद्धात भारतीय लष्कराने पाकिस्तानला गुडघे टेकायला लावले. युद्धात पाकिस्तानचा दारुण पराभव केला.
पाकिस्तानच्या 93000 सैनिकांनी भारतीय सैन्यासमोर आत्मसमर्पण केले होते. येवढेच नाही तर महायुद्धातही कोणत्याही देशाच्या सैन्याने शरणागती पत्करली नव्हती.
भारताने एका दिवसात पाकिस्तानचे रणगाडे उद्ध्वस्त केले. पाकिस्तानवर विजयाच्या आनंदात भारतीय लष्कर, नौदल आणि हवाई दल 16 डिसेंबर हा दिवस 'विजय दिवस' म्हणून साजरा करतात.
या युद्धावेळी फील्ड मार्शल 'सॅम होर्मुसजी फ्रामजी जमशेदजी माणेकशॉ' हे भारतीय लष्कराचे प्रमुख होते.
माणेकशॉ नेतृत्वाखालीच भारताने हे युद्ध लढले आणि ऐतिहासिक विजय मिळवला.
धर्माच्या आधारे भारतापासून वेगळे झालेल्या पश्चिम पाकिस्तानने तत्कालीन पूर्व पाकिस्तानवर अत्याचार केले. पुर्व पाकिस्तानला या अत्याचारातून मुक्त करण्यासाठी भारत या युद्धात सामील झाला आणि आजच्याच दिवशी पाकिस्तानातून बांगलादेश विभक्त झाला.
इतकेच नाही तर भारतीय लष्कराच्या शौर्यामुळे 16 डिसेंबर 1971ला जगाच्या नकाशावर बांगलादेशच्या रूपाने एका नव्या देशाचा जन्म झाला.