Rashmi Mane
परराष्ट्र मंत्रालयातील अतिरिक्त सचिव नगमा मोहम्मद मल्लिक 1991 च्या IFS अधिकारी आहेत.
नगमा यांची पोलंड आणि लिथुआनियामधील राजदूत म्हणून नियुक्ती करण्यात आली आहे.
केरळच्या कासारगोडमध्ये लहानाच्या मोठ्या झाल्या नगमा मल्लिक.
मल्लिक यांनी सेंट स्टीफन कॉलेजमधून इंग्रजीमध्ये बॅचलर डिग्री आणि दिल्ली स्कूल ऑफ इकॉनॉमिक्समधून पदव्युत्तर पदवी (समाजशास्त्र) मिळवली आहे.
नगमा यांना इंग्रजी, फ्रेंच, हिंदी, उर्दू आणि मल्याळम भाषा बोलता येतात.
नगमा यांनी नवी दिल्लीत परराष्ट्र मंत्रालयाच्या पश्चिम युरोप विभागात अधिकारी म्हणून काम केले आहे.
युरेशिया विभागातील संचालक म्हणून त्यांनी भारताचे रशिया आणि 11 CIS देशांसोबतचे द्विपक्षीय संबंधांमध्ये काम केले आहे.
जुलै 2010 ते सप्टेंबर 2012 पर्यंत त्या थायलंडमधील दूतावासात डेप्युटी चीफ ऑफ मिशन होत्या.