Akshay Sabale
2019 साली कोपरी-पाचपाखाडी विधानसभा मतदारसंघातून मुख्यमंत्री एकनाथ शिंदे चौथ्यांदा निवडून आले.
2019 मध्ये शिंदेंनी काँग्रेसचे संजय घाडीगावर यांचा पराभव करून विजयाचा चौकार साधला. 2004 ते 2019 च्या निवडणुकीत शिंदेंना किती मते पडली ते जाणून घेऊया..
2004 मध्ये एकनाथ शिंदे पहिल्यांदा ठाणे विधानसभा मतदारसंघातून लढले. यात 2 लाख 33 हजार 653 मते शिंदे यांना मिळाली. 37 हजार 878 मतांनी ते विजयी झाले.
दुसऱ्यांदा एकनाथ शिंदे कोपरी-पाचपखाडी मतदारसंघातून लढले. त्यात त्यांना 73 हजार 502 मते एकनाथ शिंदे यांना मिळाली. 32 हजार 776 मतांनी त्यांचा विजय झाला.
2014 मध्ये शिवसेना व भाजप युती नसतानाही शिंदे यांना 1 लाख 148 मते मिळाली होती. त्यावेळी भाजपच्या संदीप लेले यांचा त्यांनी पराभव केला होता.
चौथ्यांदा एकनाथ शिंदे कोपरी-पाचपखाडी मतदारसंघातून 89 हजार 300 मतांनी विजयी झाले. त्यांना 1 लाख 13 हजार 497 मते मिळाली.