Rashmi Mane
महाराष्ट्रातील महिला अधिकाऱ्यांच्या हातात राज्याचे नेतृत्व आहे.
महाराष्ट्रात प्रथमच, IAS, IPS आणि IFS महिला अधिकारी सीएस, डीजीपी आणि वन प्रमुख या तीन उच्च प्रशासकीय पदांवर नियुक्त केल्या आहेत.
शोमिता बिस्वास या 1988 च्या बॅचच्या महाराष्ट्र राज्यातील उत्कृष्ट कामगिरी करणाऱ्या भारतीय वनसेवेतील वरिष्ठ अधिकारी आहेत.
शोमिता बिस्वास यांनी महाराष्ट्रात प्रधान मुख्य वनसंरक्षक (वन दलाच्या प्रमुख) म्हणून पदभार स्वीकारला आहे.
राज्याच्या वनविभागात सर्वोच्च पद भूषवणाऱ्या त्या पहिल्या महिला ठरल्या आहेत.
बिस्वास यांनी प्रधान मुख्य वनसंरक्षक (PCCF) आणि Compensatory Forestation Fund Management and Planning Authority (CAMPA) चे CEO म्हणून काम केले.
याशिवाय त्या केंद्र सरकारमध्ये विविध वरिष्ठ पदावर कार्यरत होत्या.
त्यामध्ये मुख्य कार्यकारी अधिकारी राष्ट्रीय औषधी वनस्पती मंडळ, आयुष मंत्रालय दिल्ली, सहसचिव कृषी आणि शेतकरी कल्याण मंत्रालय भारत सरकार, दिल्ली या महत्त्वाच्या पदावर काम केले आहे.