IPS Ankita Sharma : नक्षलग्रस्त भागातील 'लेडी सिंघम'

Pradeep Pendhare

UPSC मध्ये यश

अंकिता शर्मा या छत्तीसगड केडरच्या 2018 च्या बॅचची IPS आहेत. UPSC 2018 परीक्षेत 1035 गुणांसह 203 वा क्रमांक मिळवला होता.

IPS Ankita Sharma | Sarkarnama

सर्वसामान्य कुटुंब

अंकिता यांचे कुटुंब छत्तीसगडमधील दुर्ग जिल्ह्यातील रहिवासी आहे. वडील व्यापारी आहेत, तर आई गृहिणी आहे. अंकिता शर्मा यांचे सुरुवातीचे शिक्षण सरकारी शाळेतून झाले आहे.

IPS Ankita Sharma | Sarkarnama

उच्च शिक्षण

ग्रॅज्युएशन पूर्ण केल्यानंतर त्यांनी पोस्ट ग्रॅज्युएशनमध्ये MBA मध्ये केले. यानंतर UPSC परीक्षेच्या तयारीसाठी दिल्लीला गेल्या. पण 6 महिन्यांतच दिल्ली सोडून घरी परतल्या. तेथूनच परीक्षेची तयारी केली.

IPS Ankita Sharma | Sarkarnama

तिसऱ्या प्रयत्नात यश

UPSC परीक्षेचा पहिल्याच प्रयत्नात प्रिलिम्स पास केले. पण मेनमध्ये 15 व्या स्थानावर राहिल्या. दुसऱ्या प्रिलिममध्येही उत्तीर्ण होऊ शकली नाही. अपयशांमुळे खचून न जाता अंकिता यांनी तिसऱ्या प्रयत्नात यश मिळवले.

IPS Ankita Sharma | Sarkarnama

पहिल्या महिला IPS

छत्तीसगड केडरमध्ये IPS पद मिळाले. यासह त्या राज्यातील पहिल्या महिला IPS अधिकारी ठरल्या. खैरागड-चुईखदान-गंडई जिल्ह्यात SP म्हणून तैनात आहेत.

IPS Ankita Sharma | Sarkarnama

यशस्वी मोहीम

नक्षलग्रस्त भागात नक्षलवादविरोधी कारवायांमध्ये अंकिता यांना प्रभारी बनवण्यात आले. या काळात त्यांनी नक्षलवाद्यांविरोधात अनेक यशस्वी मोहिमा राबवल्या आहेत.

IPS Ankita Sharma | Sarkarnama

नक्षलींमध्ये दहशत

नक्षलवादविरोधात यशामुळे IPS अंकिता यांची दहशत नक्षलवादांमध्ये पसरली. नक्षलग्रस्त भागात त्यांची 'लेडी सिंघम' म्हणून ओळख असून त्यांच्या शौर्याच्या कहाण्या देशभर प्रसिद्ध आहेत.

IPS Ankita Sharma | Sarkarnama

कौतुक

बॉलिवूड अभिनेत्री रवीना टंडन हिने देखील अंकिता यांच्या धाडसाचे कौतुक केले आहे. अंकिता या किरण बेदींना तिचा आदर्श मानते. अंकिता शर्मा यांचे पती विवेकानंद शुक्ला देखील आर्मी ऑफिसर आहेत.

IPS Ankita Sharma | Sarkarnama

NEXT : कोण आहेत माजी आमदार भीमराव धोंडे? ज्यांना अश्लील व्हिडीओच्या नावे मागितली खंडणी