Akshay Sabale
माजी आमदार भीमराव धोंडे यांना तुमचा अश्लील व्हिडिओ आमच्याकडे आहे, असे धमकावत त्यांच्याकडे एक कोटी रुपयांची खंडणी मागण्यात आली. त्यामुळे धोंडे चर्चेत आले आहेत.
69 वर्षीय भीमराव धोंडे हे आष्टी मतदारसंघाचे माजी आमदार आहेत. चार टर्म त्यांनी आष्टी मतदारसंघाचे प्रतिनिधित्व केले आहे. पहिल्यांदा 1980 ते 1985 ते अपक्ष निवडून आले होते.
त्यानंतर 1985 ते 1990 व 1990 ते 1995 काँग्रेसचे आमदार होते. आष्टी तालुक्यात शिक्षणसम्राट म्हणून त्यांची ओळख आहे.
आष्टी तालुक्यातील कडा सहकारी साखर कारखाना (सध्याचा महेश साखर कारखाना) हा भीमराव धोंडे यांच्या अधिपत्याखालीच कायम राहिलेला आहे.
तालुक्यात त्यांच्या जवळपास 40 च्या वर शिक्षण संस्था आहेत. त्यात प्राथमिक, माध्यमिक शाळा-महाविद्यालय, कृषि, बीएचएमएस कॉलेज यांचा समावेश आहे.
2009 मध्ये त्यांनी राष्ट्रवादीत प्रवेश केला होता. 2014 मध्ये भाजपमध्ये प्रवेश करून ते पुन्हा आमदार झाले. 2019 मध्ये त्यांचा राष्ट्रवादीचे बाळासाहेब आजबे यांनी पराभव केला.
आगामी विधानसभा निवडणूक लढविण्यासाठी धोंडे इच्छुक असून भाजपकडून ते प्रबळ दावेदार आहेत.