सरकारनामा ब्यूरो
अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी शनिवारी सादर केलेल्या देशाच्या अर्थसंकल्पातून सर्वसामान्य व नोकरदारांना मोठा दिलासा मिळाला आहे. यात युवकांना काय मिळाले जाणून घेऊयात...
या अर्थसंकल्पात भारतीय भाषा पुस्तक योजनेअंतर्गत शाळा व उच्च शिक्षणासाठी पुस्तकांना डिजिटल रूप दिले जाणार आहेत.
या अर्थसंकल्पातून 5.7 कोटी लघु उद्योग देशात येणार असून या उद्योगाच्या माध्यमातून 7.5 कोटी युवकांना रोजगार उपलब्ध होणार आहे.
युवकांच्या कौशल्य विकासासाठी 5 प्रशिक्षण राष्ट्रीय उत्कृष्टता केंद्रे तयार केले जाणार आहेत.
नोकराच्या विविध क्षेत्रात संधी उपलब्ध करून देत जवळपास 20 लाख तरुणांना रोजगारासाठी प्रशिक्षण दिलं जाणार आहे.
तरुणांना शिक्षणासाठी नवीन व्यावसाय स्थापन करण्यासाठी मुद्रा कर्ज या योजनेअंतर्गत कर्ज दिले जाते. योजनेची मर्यादा 10 लाखांवरून आता 20 लाख रुपयांपर्यंत वाढवण्यात आली आहे.
देशातील अनेक टॉपच्या कंपन्यामध्ये 1 कोटी युवकांना इंटर्नशिपची संधी उपलब्ध करून दिली जाणार.
2025 च्या अर्थसंकल्पामध्ये तरुणांना रोजगारासाठी 2 लाख कोटींची तरतूद करण्यात आली आहे.