सरकारनामा ब्यूरो
राष्ट्रपती भवन येथील मदर तेरेसा क्राऊन कॉम्प्लेक्समध्ये पहिल्यांदाच सनई चौघडे वाजणार आहेत. कोणाचे होणार राष्ट्रपती भवनात लग्न जाणून घेऊयात...
मूळच्या शिवपुरीच्या रहिवासी असलेल्या पूनम गुप्ता यांना राष्ट्रपती द्रोपदी मुर्मू यांनी राष्ट्रपती भवनात विवाहासाठी अनुमती दिली आहे.
पूनम गुप्ता या केंद्रीय राखीव पोलीस दल (सीआरपीएफ) मध्ये असिस्टंट कमांडर असून त्या राष्ट्रपतींच्या पर्सनल सिक्योरिटी ऑफिसर(PSO) पदावर तैनात आहेत.
त्यांचा विवाह 12 फेब्रुवारीला होणार असून या लग्नसोहळ्याला फक्त दोन्ही कुटुंबातील जवळच्या लोकांची उपस्थिती असणार आहे.
पूनम यांचा विवाह जम्मू कश्मीरमध्ये तैनात असणारे सीआरपीएफ चे डेप्युटी कमांडंट अविनीश कुमार यांच्याशी होणार आहे.
पूनम यांनी ग्वालियरच्या जिवाजी विद्यापीठ्यातून बीएडची डिग्री घेतली. तर बॅचलर ऑफ मॅथेमॅटिक्स आणि इंग्रजी साहित्यातून पोस्ट ग्रॅज्युशनची डिग्री मिळवली आहे.
पूनम यांनी 2018 ला UPSC ची परीक्षा दिली. या परीक्षेत त्यांना 81वा रँक मिळाला.
रँकनुसार त्यांची नेमणूक CAPF मध्ये असिस्टंट कमांडंट म्हणून करण्यात आली. 2023 ला त्यांनी प्रजासत्ताक दिनाच्या परेडमध्ये CRPF च्या महिला तुकडीचे नेतृत्व केले होते.