सरकारनामा ब्युरो
विविध क्षेत्रातील मोलाची कामगिरी करणाऱ्या दिग्गजांना पद्मश्री पुरस्कारांनी सन्मानित करण्यात येते. 2025 ला सन्मानित करण्यात आलेले दिग्गज कोण आहेत. जाणून घेऊयात...
नागपूरचे डॉ. विलास डांगरे हे 50 वर्षापासून रुग्णांची सेवा करत आहेत. या कामगिरीसाठी त्यांना पद्मश्री पुरस्कार देण्यात आला.
वन्यजीव संवर्धन क्षेत्रामध्ये केलेल्या उल्लेखनीय कामगिरीयाठी चैत्राम पवार यांना पद्मश्री पुरस्कारानं सन्मानित करण्यात आला आहे.
पक्षी, प्राणी आणि वनसंपदेविषयी अभ्यास करून अनेक पुस्तके लिहिणारे मारुती चित्तमपल्ली यांना यंदा पद्मश्री पुरस्कार जाहीर झाला आहे.
अभिनय श्रेत्रातील उत्कृष्ट कामगिरीबद्दल ज्येष्ठ अभिनेते अशोक सराफ यांना पद्मश्री हा पुरस्कार जाहीर झाला आहे.
जयपूर-अत्रौली घराण्यातील गायिका अश्विनी भिडे-देशपांडे यांनाही पद्मश्री पुरस्काराने सन्मानित करण्यात येणार आहे.
गायक जसपिंदर नरूला यांनाही पद्मश्री पुरस्काराने गौरवण्यात येणार आहे.
गायक आणि संगीतकार म्हणून ओळखले जाणारे अरिजीत सिंग यांना पद्मश्री पुरस्कार जाहीर करण्यात आला.
ज्येष्ठ चित्रकार वासुदेव कामत यांना कला क्षेत्रातील योगदानासाठी पद्मश्री पुरस्काराने गौरवण्यात येणार आहे.