Jagdish Patil
माजी न्यायमूर्ती नरेंद्र चपळगावकर यांचं शनिवारी (ता.25) निधन झालं.
चपळगावकर यांचा जन्म 10 एप्रिल 1937 रोजी झाला. साहित्यिक, वैचारिक लेखक आणि व्याख्याते अशी त्यांची ओळख आहे.
मुंबई उच्च न्यायालयाच्या औरंगाबाद खंडपीठाचे निवृत्त न्यायाधीश असलेल्या चपळगावकरांची कारकीर्द कशी होती ते जाणून घेऊया.
त्यांनी 1962 ते 1978 काळात बीडमध्ये तर 1979 ते 1981 दरम्यान मुंबई उच्च न्यायालयात वकिली केली.
1981 पासून मुंबई उच्च न्यायालयाच्या औरंगाबाद खंडपीठाचे न्यायाधीश म्हणून चपळगावकरांनी काम केलं.
उच्च न्यायालयाचे अतिरिक्त न्यायाधीश म्हणून त्यांची 19 जानेवारी 1990 मध्ये नियुक्ती झाली. तर कायमचे न्यायाधीश म्हणून 20 नोव्हेंबर 1990 कारभार स्वीकारला.
चपळगावकर यांचा मराठी भाषेचा दांडगा अभ्यास होता. त्यांनी अनेक मराठी पुस्तके लिहिली ,त्यामुळे कायद्याची भाषा जाणणारा न्यायाधीश साहित्याची भाषा जाणतो, असे त्यांच्याबाबात म्हटलं जातं.
फेब्रुवारी 2023 मध्ये त्यांनी वर्ध्यातील 96व्या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाचे अध्यक्षपद भूषवलं होतं.