या 5 राज्यांमध्ये रंगणार मोठी राजकीय लढत; निवडणुकीच्या रणधुमाळीला सुरूवात...

सरकारनामा ब्यूरो

नुकतेच पाच राज्यांमध्ये विधानसभा निवडणुकांच्या घोषणा झाल्या आहेत, त्यामुळे देशातील राजकीय वातावरण तापू लागले आहे.

2026 Assembly Elections India | Sarkarnama

कोणती राज्ये?

या निवडणुकांमध्ये पश्चिम बंगाल, आसाम, तमिळनाडू, केरळ आणि पद्दुचेरी या राज्यांचा समावेश आहे. या प्रमुख राज्यांमध्ये मुख्य लढत कोणत्या पक्षांसोबत असणार आहे जाणून घेऊयात.

2026 Assembly Elections India | Sarkarnama

पश्चिम बंगाल

ममता बॅनर्जी यांच्या नेतृत्वाखालील तृणमुल काँग्रेस आणि भारतीय जनता पार्टी यांच्यात पुन्हा जोरदार लढत होण्याची शक्यता आहे, मागच्या (2021) निवडनुकीत ममता बॅनर्जी यांनी 'भाजपा'ला चांगलाच धोबीपछाड दिला होता, यावेळी भाजपाने 150 चे लक्ष्य निश्चित केले आहे.

2026 Assembly Elections India | Sarkarnama

आसाम

हेमंता बिसवा शर्मा यांच्या नेतृत्वाखालील भारतीय जनता पार्टी विरुद्ध काँग्रेस आघाडी अशी मुख्य लढत दिसू शकते. परंतू आसाम मध्ये पुन्हा एकदा भाजपा सत्तेत परतू शकते असं राजकिय विश्लेषक सांगतात. 2026 Assembly Elections India

2026 Assembly Elections India | Sarkarnama

तमिळनाडू

M.K. स्टॅलिन यांच्या DMK सरकारला ADMK आणि भाजपा कडून आव्हान मिळू शकते. अनेक वर्षांपासुन भाजपा दक्षिणेत पाय रोवण्याच्या प्रयत्नात आहे.

2026 Assembly Elections India | Sarkarnama

केरळ

पिनाराई विजयन यांच्या नेतृत्वाखालीस भारतीय कम्युनिस्ट पार्टी (Marxist) आणि काँग्रेस यांच्यात पुन्हा थेट संघर्ष होऊ शकतो, भाजपाने नुकतेच तिरूअनंतपुरमच्या महापालिकेत घवघीत यश मिळवल्याने 'भाजपा'चा आत्मविश्वास दुणावला आहे.

2026 Assembly Elections India | Sarkarnama

पदुच्चेरीतील सत्ता

पदुच्चेरीमध्ये स्थानिक पक्ष आणि राष्ट्रीय पक्षांमध्ये आघाड्या महत्त्वाच्या ठरतात. छोटी मतसंख्या देखील निकाल बदलू शकते. त्यामुळे याठिकाणचा निकाल औत्सुक्याचा असणार आहे. पदुच्चेरी केंद्र शासितप्रदेश आहे, याठिकाणी 30 जागांसाठी निवडणूक होत आहे.

2026 Assembly Elections India | Sarkarnama

मतदारांचे प्रमुख मुद्दे

रोजगार, महागाई, विकास प्रकल्प, सामाजिक सुरक्षा आणि स्थानिक प्रश्न हेच मतदारांसाठी या निवडणुकीतील प्रमुख मुद्दे असणार आहेत. या पाच राज्यांतील निकाल भविष्यातील राष्ट्रीय राजकारणावर प्रभाव टाकू शकतात. त्यामुळे संपूर्ण देशाचे लक्ष या निवडणुकांकडे लागले आहे.

2026 Assembly Elections India | Sarkarnama

NEXT : 'महाराष्ट्र धर्मस्वातंत्र्य विधेयक' विधानसभेत सादर; हेतू काय? तरतुदी काय?

महाराष्ट्र धर्मस्वातंत्र्य विधेयक | Sarkarnama
येथे क्लिक करा.