मध्य प्रदेशातील 21 वर्षीय 'जेन झी'नं प्रदूषित नदीचा कायापालट करुन दाखवला; परदेशातूनही आली नोकरीची 'ऑफर'

Deepak Kulkarni

जेन झीची कमाल...

जेन झी मनात आले तर काय करु शकतात हे नव्यानं सांगायला नको, पण याचा पुन्हा एकदा जबरदस्त प्रत्यय पुन्हा एकदा मध्य प्रदेशात आला..

madhya pradesh Surendra Singh aka Bittu Tabahi clean ajnar river | Sarkarnama

नदी स्वच्छतेची मोहीम

मध्य प्रदेशमधील बियावरा येथील 21 वर्षीय सुरेंद्र सिंग चौधरी व सोशल मीडियावर 'बिट्टू तबाही' नावानं फेमस असलेल्या विद्यार्थ्यानं प्रदूषित अजनार नदी स्वच्छ करण्याची मोहीम हाती घेत तिचा अगदी कायापालट केला आहे.

madhya pradesh Surendra Singh aka Bittu Tabahi clean ajnar river | Sarkarnama

कचरा आणि गाळ काढला

कोणतंही सुरक्षेची साधने सोबत नसताना, आरोग्याबाबतचे धोके, श्वापदं,जलचर प्राणी यांचा सामना करत 'बिट्टू तबाही ने मोठ्या धाडस आणि जिद्दीनं एकट्यानेच नदीतील बराचसा कचरा आणि गाळ काढला आहे.

madhya pradesh Surendra Singh aka Bittu Tabahi clean ajnar river | Sarkarnama

जगभरात नवी ओळख

ज्यावेळी बिट्टू तबाही एका प्रदूषित नदीत उतरला त्यावेळी त्याच्याजवळ ना हातमोजे होते ना बूट...त्याला पोहताही येत नव्हतं. तरीही, त्यानं एकट्यानं नदी स्वच्छ करण्याची मोहीम फत्ते केल्यानं त्याला जगभरात नवी ओळख मिळाली आहे.

madhya pradesh Surendra Singh aka Bittu Tabahi clean ajnar river | Sarkarnama

30000 रुपये केले जमा...

विशेष म्हणजे त्यानं नदीत विसर्जित केलेल्या पूजा साहित्य, निर्माल्य यांच्यापासून खत निर्मितीची प्रक्रिया सुरू केली. या कार्यात मित्रांनाही सोबत घेत त्यानं 30000 रुपये गोळा करत स्वच्छतेची साधने व कचराकुंड्या खरेदी केल्या.

madhya pradesh Surendra Singh aka Bittu Tabahi clean ajnar river | Sarkarnama

हातांना संसर्गही...

नदी स्वच्छतेची मोहीम पार पाडत असताना बिट्टूच्या हाताला एका क्षणी तर संसर्गही झाला, मात्र त्याने हार न मानता आपलं कार्य पुढं तसंच सुरू ठेवलं.

madhya pradesh Surendra Singh aka Bittu Tabahi clean ajnar river | Sarkarnama

नोकरीची ऑफर...

त्याचं हे काम पाहून बिट्टूचं उद्योजक आनंद महिंद्रा तसेच माजी क्रिकेटपटू केविन पीटरसन यांनीही कौतुक केलं. तसेच त्याला डच संस्था 'द ओशन क्लीनअप'ने नोकरीची संधी दिली आहे.

madhya pradesh Surendra Singh aka Bittu Tabahi clean ajnar river | Sarkarnama

मुख्यमंत्र्यांनी घेतली भेट...

बिट्टूने अफाट मेहनतीनं अजनार नदी स्वच्छ केली आणि सोशल मीडियावर या स्वच्छता मोहिमेचे काही फोटो शेअर केले, जे प्रचंड प्रमाणात व्हायरलही झाले. मुख्यमंत्री मोहन यादव यांनीही त्याची शुक्रवारी भेट घेतली.

madhya pradesh Surendra Singh aka Bittu Tabahi clean ajnar river | Sarkarnama

ताकद पणाला

आता बिट्टूच्या या मोहिमेला व्यापक स्वरुप आले असून बियावरा नगरपालिकाही त्याच्यासोबत उभी राहिली आहे. नदीतील साचलेला कचरा काढण्यासाठी अवजड यंत्रसामग्री पुरवत ही नदी स्वच्छतेची मोहीम पूर्ण करण्यासाठी पूर्ण ताकद पणाला लावली आहे.

madhya pradesh Surendra Singh aka Bittu Tabahi clean ajnar river | Sarkarnama

NEXT: UPSC क्रॅक केली, IAS झाले, पण केवळ 20 महिन्यांत घेतला प्रशासकीय सेवेचा निरोप; रोमन सैनी यांचा रंजक प्रवास

Roman Saini IAS Resignation | Sarkarnama
येथे क्लिक करा...