Aslam Shanedivan
काहीच दिवसांपू्र्वी IAS दिव्या मित्तल यांनी प्रशासकीय सेवेचा निरोप घेतला होता. ज्याची देशभर जोरदार चर्चा झाली होती.
IAS दिव्या मित्तल यांनी तब्बल १३ वर्षे विविध जिल्ह्यांचे जिल्हाधिकारी पद सांभाळले होते.
पण IAS रोमन सैनी यांनी केवळ 20 महिन्यांतच प्रशासकीय सेवेचा निरोप घेतला.
वयाच्या अवघ्या २२ व्या वर्षी रोमन सैनी प्रशासकीय सेवेचा राजीनामा देत ‘अनअकॅडमी’सारखे देशातील अग्रगण्य साम्राज्य उभारलं आहे.
रोमन सैनी यांनी वयाच्या १६ व्या वर्षी ‘एम्स’ची परीक्षा उत्तीर्ण करत २०१३ च्या यूपीएससी परीक्षेत देशात १८ वा क्रमांक पटकावला होता.
दरम्यान लाल बहादूर शास्त्री राष्ट्रीय प्रशासन अकादमीत प्रशिक्षणादरम्यान गौरव मुंजाल यांच्याशी झालेल्या एका संवादाने त्यांचे विचार बदलले आणि त्यांनी विचार बदलला.
यानंतर अवघ्या दोन वर्षांहून कमी काळातच प्रशासकीय सेवेला रामराम ठोकून ऑनलाइन शिक्षणाचा पाया रचत ‘अनअकॅडमी’ची सुरुवात केली.
सरकारनामाचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.