Deepak Kulkarni
केंद्रीय रस्ते व दळण वाहतूक मंत्री नितीन गडकरी यांंनी महाराष्ट्रासह संपूर्ण देशभरात सर्वोत्तम व चकचकीत रस्त्यांचं जाळं तयार करण्याची मोहीम हाती घेतली आहे.
गुळगुळीत रस्त्यांवरुन विना अडथळा प्रवास करायचा म्हटला तर टोल भरावाच लागणार यात शंका नाही.
आता या टोल संदर्भातच मोठी अपडेट समोर आली आहे.
संपूर्ण देशात 2021- 21 ते 2024-25 (फेब्रुवारी) या मागील 5 वर्षांत एकूण 2 लाख 20 हजार 590 कोटी रुपयांचा टोल वसूल करण्यात आला.
तसेच टोल वसुलीच्या बाबतीत महाराष्ट्र चौथ्या तर उत्तर प्रदेश पहिल्या क्रमांकावर आहे.
महाराष्ट्रात राष्ट्रीय महामार्गावर एकूण 75 पेक्षा अधिक टोल प्लाझा असल्याची माहिती आहे.
आश्चर्याची बाब म्हणजे गेल्या पाच वर्षांत मराठी माणसाने 21 हजार 105 कोटी 18 लाख रुपयांचा टोल भरला असल्याचं समोर आलं आहे.
मिळालेल्या माहितीनुसार,देशभरासह महाराष्ट्रातील तील टोल प्लाझावरील वसुलीचा आकडाही दरवर्षी 500 ते 1000 कोटींनी वाढताना दिसून येत आहे.