सरकारनामा ब्यूरो
किल्ले शिवनेरीवर (ता.19) बुधवारी छत्रपती शिवाजी महाराजांची 395 वी जयंती साजरी करण्यात आली.
सोहळ्यासाठी शिवनेरी किल्ल्यावर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री अजित पवार, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे उपस्थिती होते.
छत्रपती शिवाजी महाराजांच्या जन्मसोहळा पारंपारिक पद्धतीने साजरा करण्यात आला.
यावेळी मुख्यमंत्री फडणवीसांनी शिवाजी महाराजांच्या मूर्तीला पुष्पहार घालून नमस्कार केला.
यावेळी मुख्यमंत्री फडणवीस म्हणाले, " किल्ल्यावरील सर्व अतिक्रमणे काढून टाकण्यात येणार आहेत. महाराजांचे गडकिल्ले कोणत्याही मंदिरापेक्षा मोठे आहेत. गडकिल्ले हे जागतिक वारसा होणार आहेत."
शिवजन्मोत्सव सोहळ्यानंतर अजित पवार, देवेद्र फडणवीस यांना शिवाजी महाराज आणि जिजामाता यांची मूर्ती भेट स्वरुपात देण्यात आली.
सोहळ्यासाठी खास शिवाजी महाराजांची वेषभूषा साकारुन लहान मावळ्यांनी पोवाडा आणि शिवजन्मोत्सवाचे दृश्य सादर केले.
शिवभक्तांकडून मोठ्या उत्साहात शिवरायांच्या नावाचा गजर करण्यात आला. तसेच मर्दाणी खेळाचे आयोजन करण्यात आले होते.