Pradeep Pendhare
देशातील 4 हजार 92 आमदारांविरुद्ध म्हणजेच, 45% आमदारांवर गुन्हेगारी खटले दाखल आहेत.
1 हजार 205 आमदारांविरुद्ध खून, खुनाचा प्रयत्न, अपहरण आणि महिलांवरील गुन्हे असे गंभीर आरोप आहेत.
भाजपच्या 1 हजार 653 आमदारांपैकी 39 टक्के म्हणजे 638 आमदारांवर फौजदारी गुन्हे दाखल आहेत. यात 436 आमदारांवर गंभीर आरोप आहेत.
काँग्रेसच्या 646 आमदारांपैकी 339 आमदारांवर फौजदारी गुन्हे असून यापैकी 194 जणावर गंभीर आरोप आहेत.
राज्यानुसार पाहिल्यास महाराष्ट्रातील 65 टक्के आमदारांवर फौजदारी गुन्हे दाखल आहेत.
आंध्र प्रदेशातील आमदार गुन्हेगारीत आघाडीवर असून, 138 (79 टक्के) आमदारांवर फौजदारी गुन्हे दाखल आहेत.
केरळ आणि तेलंगाणातील प्रत्येकी 69 टक्के आमदारांविरोधात फौजदारी गुन्हे दाखल आहेत.
बिहारमधील 66 टक्के, तर तामिळनाडूतील 59 टक्के आमदारांवर फौजदारी गुन्हे दाखल आहेत.
महाराष्ट्रातील 65 टक्के आमदारांपैकी 41 टक्के आमदारांवर गंभीर स्वरूपाचे गुन्हे दाखल आहेत.