Rashmi Mane
15 ऑगस्ट हा दिवस फक्त भारतासाठीच नाही, तर जगातील अनेक देशांसाठी स्वातंत्र्य आणि अभिमानाचा दिवस आहे. चला जाणून घेऊ या त्या देशांविषयी जे या दिवशी स्वातंत्र्याचा उत्सव साजरा करतात.
15 ऑगस्ट 1947 रोजी भारत ब्रिटिश सत्तेतून मुक्त झाला. तिरंगा, परेड आणि देशभक्तीच्या कार्यक्रमांनी हा दिवस देशभर साजरा केला जातो.
दक्षिण कोरिया 15 ऑगस्ट 1945 रोजी जपानी सत्तेतून मुक्त झाला. हा दिवस ‘ग्वांगबोकजेओल’ म्हणजेच प्रकाशाची पुनरागमन म्हणून साजरा केला जातो.
उत्तर कोरिया देखील 15 ऑगस्ट 1945 रोजी जपानी आक्रमणातून मुक्त झाला. याला ‘चोगुखाएबांगुई नाल’ म्हणजेच पितृभूमी मुक्ती दिवस म्हणतात.
बहरीनला 15 ऑगस्ट 1971 रोजी ब्रिटिश सत्तेतून स्वातंत्र्य मिळाले. राष्ट्रीय अभिमान आणि सांस्कृतिक सोहळ्यांसह हा दिवस तिथे साजरा होतो.
काँगो गणराज्याला 15 ऑगस्ट 1960 रोजी फ्रान्सपासून स्वातंत्र्य मिळाले. हा दिवस काँगोलिज नॅशनल डे म्हणून ओळखला जातो. यादिवशी भव्य परेड आयोजित केली जाते.
लिकटेंस्टाईन हा देशही 15 ऑगस्ट रोजी राष्ट्रीय दिन साजरा करतो, जी 1866 मध्ये जर्मन प्रभावापासून मुक्तता मिळाली होती.
भारत, दक्षिण कोरिया, उत्तर कोरिया, बहरीन, काँगो आणि लिक्टेंस्टाईन या सर्व देशांसाठी 15 ऑगस्ट हा दिवस अभिमानाचा आहे. हा दिवस स्वातंत्र्य, एकता आणि राष्ट्रीय गौरवाचं प्रतीक आहे.