बँक कर्मचाऱ्यांचा संप मागे; पण 5 दिवसांचा आठवडा नेमका कधीपासून सुरू झाला? जाणून घ्या इतिहास

Jagdish Patil

UFBU

बँक कर्मचाऱ्याच्या विविध संघटनांचे प्रतिनिधित्व करणाऱ्या UFBU ने 3 दिवसांच्या संपाची घोषणा केली होती.

UFBU strike | Sarkarnama

मागणी

मात्र हा संप मागे घेण्यात आला आहे. 6 दिवसांऐवजी 5 दिवसांचा कामाचा आठवडा करा ही UFBU ची प्रमुख मागणी आहे.

UFBU strike | Sarkarnama

5 दिवस

याच निमित्ताने 5 दिवसांच्या आठवडा या व्यवस्थेचा उदय नेमका कधी झाला ते जाणून घेऊ.

5 Day Work Week History | Sarkarnama

भारत सरकार

केंद्र सरकारने 5 दिवसांचा कामाचा आठवडा 1985 मध्ये सुरू केला. प्रशासकीय कार्यक्षमता सुधारण्यासाठी हा निर्णय घेण्यात आला होता.

5 Day Work Week History | Sarkarnama

भरपाई

सुट्टी दिल्याने कमी होणाऱ्या कामाच्या तासांच्या भरपाईसाठी दररोजच्या कामकाजात एक तासाची वाढ करण्यात आली.

Bank Employees | Sarkarnama

व्यवस्था

सध्या अनेक विकसित अर्थव्यवस्थांमधील संघटित क्षेत्रात 8 तासांचा दिवस आणि 5 दिवसांचे काम ही एक प्रमाणित व्यवस्था मानली जाते.

5 Day Work Week History

औद्योगिक क्रांती

या व्यवस्थेची मुळे 18व्या शतकातील औद्योगिक क्रांतीत आहेत. औद्योगिकीकरणानंतर कारखान्यांत काम करणाऱ्या मजुरांची संख्या वेगाने वाढू लागली.

5 Day Work Week History | Sarkarnama

हेन्री फोर्ड

1913 साली अमेरिकन उद्योगपती हेन्री फोर्ड यांनी उत्पादनाची 'मूव्हिंग असेंब्ली लाइन' नावाची पद्धत तयार केली.

Henry Ford 5 day week | Sarkarnama

नोकऱ्या

ज्यामध्ये प्रत्येक कामगाराला अधिक श्रमाचे एकच काम वारंवार करावे लागे त्यामुळे कामगार मोठ्या प्रमाणात नोकऱ्या सोडू लागले.

Sarkarnama

वेतन

त्यामुळे फोर्ड यांनी 9 तासांऐवाजी 8 तासांचा कामाचा दिवस सुरू केला आणि कर्मचाऱ्यांचे वेतनही वाढवले.

Henry Ford 5 day week | Sarkarnama

NEXT : दुष्काळ जाहीर होताच सरकारचा मोठा निर्णय; कर्ज, वीजबिलासह ‘या’ सवलती मिळणार

Maharashtra Drought Relief | Sarkarnama
क्लिक करा