Jagdish Patil
राज्य सरकारने 26 तालुक्यात दुष्काळ जाहीर करत त्याबाबतचा शासन निर्णय जाहीर केला आहे.
या निर्णयात शासनाने दुष्काळग्रस्त भागासाठी विविध उपाययोजना आणि सवलती लागू केल्या आहेत.
तर सरकारने दुष्काळी भागासाठी नेमक्या कोणत्या उपाययोजना केल्या आहेत ते जाणून घेऊया.
दुष्काळी तालुक्यांना जमीन महसूलात सूट, पिक कर्जाचे पुनर्गठन शेतीशी निगडीत कर्जाच्या वसूलीस स्थगिती देण्यात आलेय.
कृषी पंपाच्या चालू विजबिलात सूट आणि शाळा/महाविद्यालयीन विद्यार्थ्यांच्या परिक्षा शुल्कात माफी देण्याचा निर्णय.
रोहयो अंतर्गत कामाच्या निकषात शिथिलता आणून जास्तीत जास्त कामे सुरु केली जाणार.
आवश्यक तेथे पिण्याचे पाणी पुरविण्यासाठी टँकर्सचा वापर करण्यात येणार.
टंचाई जाहीर केलेल्या गावात शेतकऱ्यांच्या शेतीच्या पंपाची वीज जोडणी खंडीत न करण्याचे आदेश.
अन्न धान्याची टंचाई न होऊ देणं आणि शासन निर्देशाप्रमाणे पिण्याचे पाणी आणि जनावरांसाठी पाण्याचे नियोजन केलं जाणार आहे.