भारतातील 5 बडे नेते, ज्यांच्या संशयास्पद मृत्यूचे गूढ दशकांनंतरही कायम!

Rashmi Mane

देशातील 5 बड्या नेत्यांच्या मृत्यूचे गूढ!

देशाच्या राजकारणात मोठे स्थान मिळवलेल्या 5 नेत्यांचा मृत्यू आजही चर्चेचा विषय आहे. विमान अपघातापासून ते संशयास्पद मृत्यूपर्यंत अनेक प्रश्न अनुत्तरित आहेत. कोण होते हे नेते?

सुभाषचंद्र बोस

नेताजी सुभाषचंद्र बोस यांच्या मृत्यूबाबत आजही एकमत नाही. 1945 मध्ये तैवानमध्ये विमान अपघातात मृत्यू झाल्याचा दावा केला जातो. मात्र, त्यांच्या मृत्यूबाबत अनेक वेगवेगळे सिद्धांत मांडले गेले.

लालबहादूर शास्त्रींचा मृत्यू

भारताचे माजी पंतप्रधान लालबहादूर शास्त्री यांचे 11 जानेवारी 1966 रोजी ताश्कंद येथे निधन झाले. हृदयविकाराने मृत्यू झाल्याचे सांगण्यात आले. मात्र, विष दिल्याचा संशयही व्यक्त झाला.

ललित नारायण मिश्रा

माजी रेल्वेमंत्री ललित नारायण मिश्रा यांचा 2 जानेवारी 1975 रोजी समस्तीपूर रेल्वे स्थानकावर झालेल्या बॉम्बस्फोटात मृत्यू झाला. या घटनेमागील परिस्थितीवर अनेक प्रश्न उपस्थित झाले.

संजय गांधी

इंदिरा गांधी यांचे पुत्र संजय गांधी यांचा 23 जून 1980 रोजी दिल्लीमध्ये विमान अपघातात मृत्यू झाला. विमान कोसळण्यामागे कट असल्याच्या चर्चाही रंगल्या; मात्र ठोस पुरावे समोर आले नाहीत.

श्यामा प्रसाद मुखर्जी

जनसंघाचे संस्थापक श्यामा प्रसाद मुखर्जी यांचा 1953 मध्ये काश्मीरमधील नजरकैदेत मृत्यू झाला. उपचारांदरम्यान त्यांना चुकीचे औषध दिल्याचा आरोप त्यांच्या कुटुंबीयांनी केला होता.

चौकशीवरूनही प्रश्न कायम

या नेत्यांच्या मृत्यूबाबत वेगवेगळे दावे, आरोप आणि तपास झाले. काही प्रकरणांत न्यायालयीन प्रक्रिया झाली, तर काही प्रकरणांत मृत्यूच्या परिस्थितीबाबत प्रश्न कायम राहिले.

इतिहासातील अनुत्तरित प्रश्न!

या 5 नेत्यांच्या मृत्यूशी संबंधित घटना आजही भारतीय राजकीय इतिहासातील चर्चेचे विषय आहेत. नेमके सत्य काय, याबाबत अनेक प्रश्न आणि ऐतिहासिक वाद आजही कायम आहेत.

Next : शिवसेनेत मोठ्या पदाची जबाबदारी असलेल्या शायना एनसी अडचणीत; काय आहे प्रकरण..?

येथे क्लिक करा