Deepak Kulkarni
एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेच्या नेत्या शायना एनसी या मोठ्या वादात सापडल्या आहेत.
मुंबईतील एका पत्रकार परिषदेत काँग्रेस नेत्या सोनिया गांधींच्या पुस्तकातील पानावर आक्षेप घेताना त्यांनी बाळासाहेब ठाकरेंचा फोटो फाडल्याचा आरोप त्यांच्यावर केला जातोय.
अखेर शायना एनसी यांच्याविरोधात विरोधक आक्रमक झाले असतानाच त्यांच्या बचावासाठी उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे मैदानात उतरावं लागलं आहे.
एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वाखालील शिवसेनेमध्ये शायना एनसी यांच्याकडे प्रभारी राष्ट्रीय सचिव (In-Charge National Secretary) हे पद आहे.
शिवसेनेचे मुख्य नेते एकनाथ शिंदेंच्या आदेशानुसार त्यांची या पदावर नियुक्ती करण्यात आली आहे. ही निवड 1 मे 2026 पासून एक वर्षासाठी लागू राहणार आहे.
यापूर्वी त्यांच्याकडे ऑगस्ट 2025 मध्ये त्यांची शिवसेनेच्या राष्ट्रीय प्रवक्तेपदाची जबाबदारी सोपवण्यात आली होती.
तसेच नोव्हेंबर 2024 मध्ये भाजपमधून शिवसेनेत प्रवेश केल्यानंतर त्यांनी मुंबादेवी विधानसभा मतदारसंघातून निवडणूक लढवली होती.
एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेत प्रवेश करण्याअगोदर 14 सप्टेंबर 2004 मध्ये शायना यांनी भाजपमध्ये प्रवेश केला होता.
त्या जवळपास वीस वर्ष भाजपमध्ये होत्या. मार्च 2010 मध्ये भाजपने त्यांना राष्ट्रीय कार्यकारिणीच्या सदस्या बनवले. तसेच एप्रिल 2013 मध्ये भाजपने शायनाला राष्ट्रीय प्रवक्ता बनवले.