ट्रॅफिक पोलिसांच्या कारवाईला घाबरताय? गाडी चालवताना 'हे' 5 नियम लक्षात ठेवा

Rashmi Mane

कारवाईपासून वाचायचंय?

रस्त्यावर गाडी चालवताना ट्रॅफिक पोलिसांकडून होणारी कारवाई टाळायची असेल, तर वाहतुकीचे नियम पाळणं गरजेचं आहे. वाहन चालवताना हे 5 महत्त्वाचे नियम कायम लक्षात ठेवा.

ड्रायव्हिंग लायसन्स जवळ ठेवा

दुचाकी असो वा चारचाकी, वाहन चालवताना वैध ड्रायव्हिंग लायसन्स असणं आवश्यक आहे. पोलिसांनी विचारल्यास ते दाखवता आलं पाहिजे.

हेल्मेट आणि सीटबेल्ट विसरू नका

दुचाकीवर चालकासह नियमानुसार दोघांनीही हेल्मेट वापरावे. चारचाकी चालवताना चालक आणि प्रवाशांनी सीटबेल्ट लावणं बंधनकारक आहे.

सिग्नल तोडण्याची चूक करू नका

लाल सिग्नल असताना वाहन पुढे नेल्यास दंड होऊ शकतो. त्यामुळे सिग्नल, झेब्रा क्रॉसिंग आणि वाहतूक पोलिसांच्या सूचनांचं पालन करा.

वेगावर नियंत्रण ठेवा

वेगमर्यादा ओलांडून वाहन चालवणं धोकादायक आहे. रस्त्यावरील वेगमर्यादेचं पालन करा. भरधाव गाडी चालवल्यास दंडात्मक कारवाई होऊ शकते.

वाहनाची कागदपत्रे अपडेट ठेवा

वाहनाचं RC, विमा, PUC आणि ड्रायव्हिंग लायसन्स वैध असणं आवश्यक आहे. DigiLocker किंवा mParivahan मधील डिजिटल कागदपत्रेही दाखवता येतात.

मोबाईलवर बोलत गाडी चालवू नका

वाहन चालवताना हातात मोबाईल घेऊन बोलणं टाळा. यामुळे अपघाताचा धोका वाढतो आणि वाहतूक नियमांचं उल्लंघन केल्यास कारवाई होऊ शकते.

नियम पाळा, सुरक्षित राहा!

वाहतुकीचे नियम पाळल्यास दंड आणि पोलिसांच्या कारवाईचा त्रास टाळता येतो. सर्वात महत्त्वाचं म्हणजे स्वतःचा आणि इतरांचा जीव सुरक्षित राहतो.

Next : भारतातील 5 बडे नेते, ज्यांच्या संशयास्पद मृत्यूचे गूढ दशकांनंतरही कायम!

येथे क्लिक करा