Rashmi Mane
वृद्धापकाळात तुमचं आयुष्य आर्थिकदृष्ट्या सुरक्षित करण्यासाठी अटल पेंशन योजना आहे सर्वोत्तम उपाय!
केंद्र सरकारने 2015 साली सुरू केलेली ही योजना आहे, ज्यात 60 वयानंतर दरमहा 1000 ते ₹5000 पेंशन मिळते.
कोणताही भारतीय नागरिक ज्याचं वय 18 ते 40 वर्षांदरम्यान आहे आणि जो इनकम टॅक्सच्या कक्षेत येत नाही, तो या योजनेचा लाभ घेऊ शकतो.
तुमचं वय 18 असेल, तर 210 प्रतिमाह भरून मिळवता येते 5000 पेंशन.
पती-पत्नी दोघांनीही ही योजना घेतली, तर मिळू शकते 10,000 पर्यंत दरमहा पेंशन !
तुमच्या योगदानासोबत केंद्र सरकारदेखील हिस्सा देते, त्यामुळे रक्कम लवकर जमा होते.
जवळच्या बँकेत जाऊन आधार कार्ड, मोबाईल नंबर आणि बँक अकाउंटद्वारे सहज खाते उघडता येते.
जर नियमित हप्ता भरला तर 60 वयानंतर एकूण 8.5 लाखांपर्यंत पेंशनचा लाभ मिळू शकतो.