Rashmi Mane
15 ऑगस्ट 2025 पासून देशभरात लागू होणार आहे "वार्षिक फास्टॅग टोल पास योजना".
NHAI आणि नेशनल एक्सप्रेसवेवर आता 3000 रुपयांत 200 ट्रिपपर्यंत टोल फ्री! वार्षिक Fastag Toll Pass केवळ खासगी वाहनांसाठी उपलब्ध.
15 ऑगस्ट 2025 पासून देशभरात ही योजना लागू होईल. यासाठी RajmargYatra App किंवा NHAI वेबसाइटवरून पास रिचार्ज करता येईल.
फक्त 3000 मध्ये 1 वर्षासाठी 200 ट्रिप्स पण दरवर्षी रिन्यू करावा लागणार हा पास. यामध्ये NHAI आणि NE टोल नाक्यांटा समावेश.
नाही! जुना Fastag वापरूनच वार्षिक टोल पास रिचार्ज करता येईल. फक्त Fastag ब्लॅकलिस्टेड नसावा, एवढीच अट आहे.
RajmargYatra अॅप किंवा NHAI.gov.in वर जाऊन टोल पास रिचार्ज करा. UPI किंवा इतर अॅप्सवरून सध्या रिचार्ज शक्य नाही.
देशातील सर्व NHAI आणि National Expressway टोल नाक्यांवर टोल माफ. मात्र राज्य सरकार वा खाजगी टोल यावर लागू नाही.
सध्या ही सुविधा फक्त खासगी चारचाकी वाहनांसाठी आहे. कमर्शियल वाहनांसाठी ही योजना अद्याप लागू नाही.