सरकारनामा ब्यूरो
कौशल किशोर हे 2022 बॅचचे भारतीय वन सेवा (IFS) अधिकारी आहेत.
2016 ला त्यांनी पहिल्यांदा UPSC परीक्षा दिली होती. मात्र त्यांना अपयश आले.
वडील शेतकरी, आई गृहीणी होती. त्यांची आर्थिक परिस्थिती हालाकीची होती.यामुळे त्यांनी पदवी मिळवल्यानंतर पीडब्ल्यूसीमध्ये तंत्रज्ञान सल्लागार म्हणून नोकरीला लागले.
2017 आणि 2018 या दोन्ही वर्षाच्या प्रयत्नात ते साधी प्रिलिम्सची परीक्षाही उत्तीर्ण करु शकले नाहीत.
2019ला त्यांनी तिसऱ्या प्रयत्नात, प्रिलिम्स परीक्षा उत्तीर्ण झाले परंतु मुख्य परीक्षेचा टप्पा पार अयशस्वी झाले.
चौथ्या प्रयत्नात तीन गुणांनी मागे राहिले यामुळे शेवटच्या यादीतून त्याचे नाव बाहेर पडले.
त्यांनी न हार मानता आयआयटी-जेईईचे कोचिंग क्लास घेत परीक्षेची तयारी सुरु ठेवली.
पाचव्या प्रयत्नात मात्र UPSC परीक्षा उत्तीर्ण करत त्यांनी 80 वा रँक मिळवला. त्याच्या रँकनुसार त्यांची नियुक्ती (IFS) भारतीय वन विभागासाठी करण्यात आली.