सरकारनामा ब्यूरो
अहिंसा आणि शांततेचा मार्गाने देशाला स्वातंत्र्य मिळवून देणारे राष्ट्रपिता महात्मा गांधी यांची आज 77 वी पुण्यतिथी आहे.
1948 ला दिल्लीतील बिर्ला हाऊसमध्ये महात्मा गांधी यांची नथुराम गोडसे याने हत्या केली.
मार्टिन ल्यूथर, किंग ज्युनियर, नेते जेम्स लॉसन,नेल्सन मंडेला अशा जगातील अनेक नेत्यांनी सामाजिक न्याय आणि समजतेची प्रेरणा महात्मा गांधी यांच्याकडून घेतली.
1948 ला गांधीजीची हत्या होण्याच्या काही दिवस आधी त्यांना शांततेच्या पुरस्कारासाठी नामांकन देण्यात आले होते. त्यांना 1937 ते 1948 या दरम्यान तब्बल पाच वेळा नोबेल शांततात पुरस्कारासाठी नामांकन मिळाले होते.
स्वातंत्र्य लढ्यात व्यग्र असूनही गांधींजींनी आपली खेळाची आवड जोपासली. फुटबॉल हा त्यांचा आवडता खेळ होता.
1900 च्या दशकात हेन्री थोरो आणि लिओ टॉल्स्टॉय यांच्या लेखनाच्या तत्त्वज्ञानाने प्रेरित होऊन गांधींनी दोन फुटबॉल क्लबची स्थापना केली होती. या क्लबला 'पॅसिव्ह रेझिस्टर्स' असे नाव देण्यात आले.
स्वातंत्र्यलढ्यात अहिंसा आणि सत्याच्या मार्गाने केलेल्या कामगिरीचे गौरव म्हणून प्रसिद्ध लेखक रवींद्रनाथ टागोर यांनी गांधींना 'महात्मा' ही पदवी दिली.
महात्मा गांधी यांनी 'माझे सत्याचे प्रयोग' ही आत्मकथा लिहिली आहे.