सरकारनामा ब्यूरो
UPSC परीक्षा पास होणे म्हणजे फक्त तुमच्या ज्ञानाची परीक्षा नाही तर तुमचा संयम,समर्पण आणि कठोर परिश्रम याची ओळख आहे. याच परिश्रमाचं उत्तम उदाहरण आहेत निधी सिवाच.
हरियाणाच्या निधी सिवाच या लहानपासूनचं अभ्यासात खूप हुशार होत्या.
निधी लहानपणापासूनच हुशार होत्या. यांना 10वी मध्ये 95% आणि 12वी मध्ये 90% गुण मिळाले. त्यांनी सोनीपत या विद्यापीठातून मेकॅनिकल इंजिनिअरिंगमध्ये बीटेकची डिग्री मिळवली.
शिक्षण पूर्ण झाल्यानंतर त्यांनी हैदराबाद येथील टेक महिंद्रा कंपनीत डिझाईन इंजिनिअर म्हणून नोकरी केली.
काही दिवसातचं त्यांनी ही नोकरी सोडली आणि UPSC परीक्षा देण्याचे ठरवले.
कुटुंबीयांनी त्यांच्या लग्नासाठी हट्ट धरला त्यामुळे त्यांनी कंटाळून स्व:ताला कोंडून घेतले.
निधी यांनी कुटुंबाशी काही न बोलता सहा महिने स्वतःला एका खोलीत कोंडून घेतले आणि पूर्ण लक्ष त्यांच्या UPSCच्या परीक्षेवर केंद्रीत केले.
पहिल्या दोन प्रयत्नात त्यांना अपयश आले मात्र त्या प्रयत्न करात राहिल्या. त्यांनी तिसऱ्या यूपीएससी उत्तीर्ण करत 2018 ला देशात 83 वा रँक मिळवला.