Rashmi Mane
सध्या दिल्लीमध्ये 'प्रजासत्ताक दिन' परेडची तयारी उत्साहात सुरु आहे. या वर्षी भारत आपला 75 वा प्रजासत्ताक दिन साजरा करणार आहे.
या दिवशी परेडमधून देशचा समृद्ध सांस्कृतिक वारसा आणि अफाट लष्करी सामर्थ्याचे दर्शन सर्वांना होते.
आपल्या सर्वांना माहित आहे की दरवर्षी 26 जानेवारीची परेड नवी दिल्लीतील 'कर्तव्यपथ' (राजपथवर) आयोजित केली जाते, परंतु 1950 ते 1954 पर्यंत राजपथावर परेडचे आयोजन होत नव्हते. या चार वर्षांमध्ये, 26 जानेवारीची परेड इर्विन स्टेडियम (आताचे नॅशनल स्टेडियम), किंग्सवे, लाल किल्ला आणि रामलीला मैदानावर आयोजित करण्यात आली होती.
1955 मध्ये, राजपथ हे 26 जानेवारीच्या परेडचे कायमचे ठिकाण बनले. राजपथ तेव्हा 'किंग्सवे' म्हणून ओळखले जात होते, जे आता 'कर्तव्यपथ' म्हणून ओळखले जाते.
दरवर्षी 26 जानेवारी रोजी होणाऱ्या परेडसाठी कोणत्याही देशाच्या पंतप्रधान/राष्ट्रपती/किंवा राज्यकर्त्याला पाहुणे म्हणून आमंत्रित केले जाते.
26 जानेवारीचा परेड कार्यक्रम राष्ट्रपतींच्या आगमनाने सुरू होतो. सर्वप्रथम, राष्ट्रपतींचे घोडेस्वार अंगरक्षक राष्ट्रध्वजाला सलामी देतात आणि या दरम्यानच राष्ट्रगीत वाजवले जाते आणि 21 तोफांची सलामी देखील दिली जाते.
पण बंदुकांमधून गोळीबार होत नाही, त्याऐवजी, "25-पाऊंडर्स" म्हणून ओळखल्या जाणार्या भारतीय लष्कराच्या 7 तोफा वापरल्या जातात.
परेडमध्ये सहभागी होणार्या प्रत्येक सैनिकाला 4 स्तरांच्या सुरक्षा तपासणीतून जावे लागते. याव्यतिरिक्त, त्यांची शस्त्रे जिवंत गोळ्यांनी भरलेली नाहीत याची खात्री करण्यासाठी त्यांची कसून तपासणी केली जाते.