Rashmi Mane
अनेक उमेदवारांचं आयपीएस व्हायचं स्वप्न असतं.
आयपीएस अधिकारी हे 'यूपीएससी' परीक्षेच्या माध्यमातून निवडले जातात.
'यूपीएससीमध्ये पूर्व परीक्षा, मुख्य परीक्षा आणि मुलाखत हे तिन्ही टप्पे पार केल्यानंतर त्यांच्या श्रेणीनुसार त्यांना पदे दिली जातात.
आयपीएस हे पद प्रामुख्याने कायदा आणि सुव्यवस्थेशी संबंधित असतो. यामध्ये पोलिस खात्यातील सर्वोच्च पदांचा समावेश होतो.
आयपीएस अधिकाऱ्याचा दर्जा हा खूप महत्त्वाचा असतो
या अधिकाऱ्यांना डेप्युटी एसपी ते एसपी, आयजी तसेच डीआयजी व डीजीपी या पदांवर प्रमोशन मिळते.
आयपीएस अधिकाऱ्यांच्या पगाराचा विचार केला तर त्यांना सातव्या वेतन आयोगानुसार पगार मिळतो.
आयपीएस अधिकाऱ्यांना 56 हजार 100 ते 2 लाख 25 हजारांपर्यंत पगार मिळतो. महागाई भत्ता आणि इतर अनेक प्रकारचे भत्ते देखील आयपीएस अधिकाऱ्यांना मिळतात.