Government Employee: सर्व सरकारी कर्मचाऱ्यांसाठी 13 एप्रिल 2026 तारीख ठरणार टर्निंग पॉईंट? मोठा निर्णय होणार...

Deepak Kulkarni

मोठी बातमी

केंद्र व राज्य सरकारच्या कर्मचाऱ्यांसाठी मोठा दिलासा देणारी बातमी समोर येत आहे.

Government Employee 8 th pay commission | Sarkarnama

वेटिंगवर वेटिंग

सर्व सरकारी कर्मचाऱ्यांसाठी सर्वात मोठं गिफ्ट मानले जात असलेल्या आठवा वेतन आयोगासाठी वेटिंगवर वेटिंग सुरू आहे.

Government Employee 8 th pay commission | Sarkarnama

कर्मचारी वर्गात उत्सुकता

आठवा वेतन नेमका केव्हा लागू होणार याविषयी चर्चांना उधाण आलं आहे. पगारवाढ, भत्ते आणि निवृत्तीवेतन यामध्ये मोठ्या सुधारणा होण्याची शक्यता असल्यामुळे कर्मचारी वर्गात कमालीची उत्सुकता वाढली आहे.

Government Employee 8 th pay commission | Sarkarnama

बैठक होणार

8 व्या वेतन आयोग लागू करण्याबाबत येत्या 13 एप्रिल 2026 रोजी अतिशय महत्त्वाची बैठक होणार आहे. 

Government Employee 8 th pay commission | Sarkarnama

राष्ट्रीय परिषद मसुदा समिती

केंद्र सरकारी कर्मचारी आणि निवृत्तीवेतनधारकांचे प्रतिनिधित्व करणाऱ्या राष्ट्रीय परिषदेच्या मसुदा समितीची ही बैठक असणार आहे.

Government Employee 8 th pay commission | Sarkarnama

...म्हणून निर्णायक बैठक

या बैठकीत पगारवाढीबाबत तसेच इतर आर्थिक सुविधांबाबत सखोल चर्चा होण्याची शक्यता आहे. त्यामुळे ही बैठक अत्यंत निर्णायक मानली जात आहे.

Government Employee 8 th pay commission | Sarkarnama

यापूर्वीही बैठक

राष्ट्रीय परिषदेच्या मसुदा समितीची यापूर्वी 12 मार्च 2026 रोजीही बैठक पार पडली होती.

Government Employee 8 th pay commission | Sarkarnama

आयोगाच्या अध्यक्षांना पत्र

सरकारी कर्मचाऱ्यांकडून आठव्या वेतन आयोगाबाबत सूचना मागवण्यात आल्या होत्या. त्यासाठी 31 मार्च 2026 पर्यंत मुदत देण्यात आली होती. तसेच राष्ट्रीय परिषदेने आयोगाच्या अध्यक्षा रंजना प्रकाश देसाई यांना पत्र लिहून काही बदल सुचवले होते.

Government Employee 8 th pay commission | Sarkarnama

मोठा टप्पा

आठव्या वेतन आयोगाबाबतची ही 13 एप्रिलची बैठक ही सरकारी कर्मचाऱ्यांसाठी अत्यंत महत्त्वाची ठरणार असून, पगारवाढीच्या दिशेने हा मोठा टप्पा मानला जात आहे. या बैठकीत रेल्वे आणि संरक्षण क्षेत्रातील कर्मचाऱ्यांचे प्रतिनिधीही सहभागी होणार आहेत.

Government Employee 8 th pay commission | Sarkarnama

NEXT फडणवीसांचे धडाकेबाज निर्णय: AI वर भर, IT कॅडर; काय बदलणार?

Maharashtra News | Sarkarnama
येथे क्लिक करा...