Maharashtra News: फडणवीसांचे धडाकेबाज निर्णय: AI वर भर, IT कॅडर; काय बदलणार?

Mangesh Mahale

महत्त्वाचे निर्णय

राज्य मंत्रिमंडळाच्या आजच्या बैठकीत पाच महत्त्वाचे निर्णय घेण्यात आले. राज्याच्या विकासाला नवे तंत्रज्ञान आणि आर्थिक बळ देणारे हे महत्त्वाचे निर्णय असल्याचे मानले जाते.

Maharashtra Cabinet Decisions 2026 | Sarkarnama

स्वतंत्र IT कॅडर

डिजिटल गव्हर्नन्स, AI आणि IT क्षेत्राला मोठी चालना मिळणार आहे. माहिती तंत्रज्ञान संचालनालयाचे रूपांतर आयुक्तालयात होणार आहे. त्यासाठी IT कॅडर तयार केला जाणार आहे

Maharashtra Cabinet Decisions 2026 | Sarkarnama

ऊर्जा विभाग

प्रशासनात आधुनिक तंत्रज्ञानाचा वापर वाढवण्यासाठी दोन महत्त्वाच्या कंपन्या स्थापन केल्या जाणार आहेत.महाराष्ट्र राज्य विद्युत वितरण कंपनी महावितरणची आर्थिक पुनर्रचना होणार.

Maharashtra Cabinet Decisions 2026 | Sarkarnama

सरकारी रोखे

शासन हमी असलेल्या कर्जा (३२,६७९ कोटी) साठी भांडवली बाजरात सरकारी रोखे येणार. कृषी वितरण व्यवसायाचे विभाजन करण्यात येणार. महावितरण कंपनी भांडवली बाजारात सूचीबद्ध होणार.

Maharashtra Cabinet Decisions 2026 | Sarkarnama

MRSAC

महाराष्ट्र रिमोट सेन्सिंग अॅप्लिकेशन सेंटरचे (MRSAC) आता कंपनीत रुपांतर होणार आहे. रस्ते माहिती प्रणाली, नगररचना, जलयुक्त शिवार – पाणलोट विकास, खनिच व खाणींचा अभ्यासाला गती मिळणार आहे.

Maharashtra Cabinet Decisions 2026 | Sarkarnama

MRDP

महाराष्ट्र प्रतिसादक्षम विकास कार्यक्रम (MRDP) राबविण्यास मंजुरी देण्यात आली आहे. खाजगी भांडवलाच्या मदतीने वित्तपुरवठा उभारण्यात येणार आहे. यासाठी जागतिक बँकेकडून १६५ कोटींचा निधी मिळणार आहे.

Maharashtra Cabinet Decisions 2026 | Sarkarnama

पूराचा धोका

पुराच्या पाण्याचा निचऱ्यासाठी कोल्हापूर, सांगली, इचलकरंजी शहरांसह, कृष्णा खोऱ्यातील पूराचा धोका कमी करण्यासाठी प्रतिबंधक आराखडे तयार करण्यात येणार.

Maharashtra Cabinet Decisions 2026 | Sarkarnama

महाजिओटेक

प्रशासनात गतिमानता आणण्यासाठी भू-स्थानिक तंत्रज्ञानाचा (Geospatial Technology) वापर करण्यासाठी महाराष्ट्र जिओटेक्नॉलॉजी अॅप्लिकेशन सेंटर (महाजिओटेक) कंपनी स्थापन करण्यात येणार आहे.

Maharashtra Cabinet Decisions 2026 | Sarkarnama

NEXT: शरद पवारांनी घेतली तिसऱ्यांदा राज्यसभेच्या खासदारकीची शपथ; पवारांच्या तीन पिढ्या एकाचवेळी संसदेतZ

येथे क्लिक करा