Rashmi Mane
केंद्र सरकारच्या जवळपास 1 कोटींपेक्षा जास्त कर्मचारी आणि निवृत्तांना 8व्या वेतन आयोगाची आतुरतेने वाट पाहावी लागत आहे.
सर्वांना अपेक्षा होती की लवकरच पगारवाढीची गोड बातमी मिळेल. पण सध्याच्या घडामोडींवरून दिसतंय की अजून थांबावं लागणार आहे.
रिपोर्ट्सनुसार, 8व्या वेतन आयोगाच्या शिफारशी 2027 च्या शेवटी किंवा 2028 च्या सुरुवातीला लागू होऊ शकतात.
7व्या वेतन आयोगाचा अनुभव पाहता ही प्रक्रिया लांबणारी आहे. आयोगाची घोषणा, कामकाज ठरवणे आणि शिफारशी लागू करणे यात वर्षे जातात.
जानेवारी 2025 मध्ये आयोग स्थापन होणार असल्याची घोषणा झाली. पण अजून त्याचा ToR (Terms of Reference), अध्यक्ष किंवा सदस्यांची नावे ठरलेली नाहीत.
वित्त राज्यमंत्री पंकज चौधरी यांनी सांगितले की सरकारला सूचना मिळाल्या असून लवकरच अधिकृत अधिसूचना जारी होईल.
7वा वेतन आयोग 2016 मध्ये लागू झाला होता. मात्र त्याला प्रत्यक्षात लागू व्हायला सुमारे 2 वर्षे 9 महिने लागले होते.
महागाई वाढत असताना कर्मचारी आणि पेन्शनधारक दोघेही पगार व पेन्शन रिव्हिजनबाबत चिंतेत आहेत.